मुंबई / अजेयकुमार जाधव / 8 Sep 2015
ढ़ोगी बाबा गुरुवानंद स्वामी यांच्या संपत्तीची एसआईटीकडून चौकशीची मागणी सावधान संसंस्थेचे अध्यक्ष व निर्भय पथिक दैनिकाचे संपादक अश्विनी कुमार मिश्र प्रेस कल्ब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.
बाबा गुरुवानंद स्वामी हा ढोंगी बाबा आपण कोणत्याही स्त्रीच्या पोटातून जन्म घेतला नाही, मी शिवजीचा अवतार आहे, १२ वर्षाचा असताना जगातील सर्व तांत्रिक विद्या आत्मसात केल्या असून ४२ सेकंदात कोणत्याही देशात प्रकट होऊ शकतो, जगातील सर्व धर्म ग्रंथांचे ज्ञान आपल्याला असल्याचा, आणि
विश्व धर्म संसदेने आपल्याला आठ वेळा सुवर्ण पदक दिल्याचा दावा करत असल्याची माहिती अश्विनी कुमार मिश्र यांनी दिली.
या ढोंगी बाबा बाबत खूप माहिती काढल्यावर बाबा गुरुवानंद स्वामी कडे दोन पासपोर्ट, दो प्यान कार्ड आहेत.
बाबाची जन्म १२ जानेवारी १९४१ आहे. श्री ब्रहमर्षि गुरुवानंद सर्वधर्म सेवा आश्रम, चेन्नई येथे असून हा
आश्रम (ट्रस्ट) आऱ डी द्विवेदी या नावाने नोंद आहे. या ढोंगी बाबाच्या वडिलांचे नाव आर डी द्विवेदी आणि आईचे नाव आनंदी बाई आहे. कुठल्याही आईच्या पोटी जन्म न घेणाऱ्या या बाबाचा जन्म आंध्र प्रदेशच्या अथुरु येथे झाला आहे. आठ वर्षात या बाबाने ३ हजार करोड रुपयांची संपत्ती जमा केली आहे.
सावधान संस्थेने भारताचे राष्ट्रपति, प्रधानमंत्री, वित्र मंत्री, तसेच मुख्यमंत्री देवेन्द्र फडनवीस यांना या ढोंगी बाबा बाबत माहिती व पुरावे दिले आहेत. या ढोंगी बाबावर कारवाई करून त्याची संपत्ती जप्त करावी तसेच हा ढोंगी बाबा भारत सोडून फिजी या देशात पळून जाण्या आधी त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी मिश्रा यांनी केली आहे.
