मुंबई, दि. 13
राष्ट्रवादीतर्फे उदया करण्यात येणारे जेल भरो आंदोलन हे जेल से रोको आंदोलन आहे. राष्ट्रवादी हा पक्ष नेहमीच कंत्राटदार पूरक भूमिका घेणारा पक्ष असून एखाद्या नविन कंत्राटासाठी किंवा सिंचनामधील एखाद्या कंत्राटदाराचे थकीत बिल काढण्यासाठी ते जेलभरो करून दबाव तर आणत नाही ना? असा खोचक सवाल करीत राष्ट्रवादीचे राज्यातील कायदा अाणि सुव्यवस्था बिघडविण्याचे यापुर्वीचे प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर केलेला हा खटाटोप आहे, अशा शब्दात मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीचा समाचार घेतला.
दादर येथील वसंत स्मृती कार्यालयाच्या सभागृहात आज मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांची पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी जेल भरो आंदोलनाची हाक देणाऱया राष्ट्रवादीचा शेलक्या शब्दात सचार घेतला. प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये ही उपस्थित होते.
यावेळी आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम हे जेलमध्ये गेले. छगन भूजबळ यांची चौकशी सुरू आहे. तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनाही नोटीस बजावण्यात आल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. हे आणि अन्य नेते कायदेशिर रित्या जेलमध्ये जाणार आहेतच. पण या पक्षाच्या जुन्या सवयीनुसार दबाव तत्राचा वापर करून हे जेल से रोको आंदोलन करण्याचा हा त्यांचा डाव आहे. पण नवे सरकार त्यांच्या या दबावाला भिक घालणार नाही, असेही आमदार अॅड आशिष शेलार यांनी सांगितले.
काही दिवसापुर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार म्हणाले होते की आम्हाला कधी जेलमध्ये टाकत आहेत याची वाट पाहतो आहोत,. गरज नसताना शरद पवार यांच्या सारख्या वरिष्ठ नेत्याने डोकी भडकविण्यासाठी केलेले हे विधान आणि त्यानंतर मराठवाडा आणि दुष्काळी भागात फिरणारे राष्ट्रवादीचे नेते शेतकऱयाला मदत करण्यापेक्षा लोकांची डोकी भडकवत आहेत. तर दुष्काळाबाबत सरकारने धोरण बदलले नाही तर राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण् होईल असेही शरद पवार म्हणाले होते. ही सूचना होती की धमकी? तसेच महाराष्ट्र भूषण पुरस्कारावरून वाद निर्माण करून राष्ट्रवादीचे नेते राज्यात भाषण करीत फिरत होते त्यावरून या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा त्यांचा हा डाव तर नाही ना ? असा आरोप करीत आमदार शेलार यांनी या आंदोलनाचा खरपूस समाचार घेतला. पण ही त्यांची रणनिती यशस्वि होणार नाही, असेही आमदार अॅड शेलार यांनी नमूद केले.
राष्ट्रवादी हा पक्ष नेहमीच शेतकऱया पेक्षा कंत्राटदार पूरक भूमिका घेणारा राहिला आहे. हे आंदोलन करून त्यांना एखादे नवे कंत्राट निर्माण व्हावे, अशी परिस्थिती तर निर्माण कराची नाही ना ? किंवा सिंचन घोटाळयातील एखाद्या कंत्राटदाराचे थटलेले बिल काढण्यासाठी केलेला हा प्रयत्न तर नाही ना ? असा प्रश्नही माझ्या सारख्याच्या मनात येतो. पण त्यांचा हा प्रयत्न हे सरकार यशस्वि होऊ देणार नाही. त्यांना अशा प्रकारे दबाव तंत्र वापरण्या़ची ही जूनीच सवय असल्याची पुष्टीही जोडत आमदार अॅड शेलार यांनी त्यांची खिल्ली उडविली. सरकार राज्यातील दुष्काळाबाबत गंभीर आणि संवेदनशिल आहे. वेगवेगळया पातळीवर उपाय योजना करण्यात येत आहेत. त्यामुळे या राज्यातील शेतकऱयांना मी आवाहन करतो की सरकार आपल्या पाठीशी खंबिरपणे उभे आहे,. असेही अामदार शेलार यांनी सांगितले.
राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: दौरा केला. सरकारमधील मंत्री आणि पालकमंत्री राज्यात फिरत आहेत. तसेच अधिकाऱयांच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करून तात्काळ निर्णय व्हावेत म्हणून सरकारने निर्णय घेतला आहे. राज्याकडून साडेचारशे कोटी आणि केंद्राकडून आलेले पाचशे कोटीची मदत शेतकऱयांपर्यंत पोहचली अाहे. चारा उपलब्ध करून देण्यात येतो आहे, गुरांच्या छावन्या लावण्यात येत अाहेत. वीस हजार टंचाई ग्रस्त गावांपैकी पाच हजार गावे टंचाई मुक्त् करण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. राजिव गांधी अारोग्य योजनेमध्ये शेतकऱयांना सामावून घेण्यात आले आहे. अन्न सुरक्षा योजनेत सामावून घेण्यात आले आहे. पिक कर्जात सवलत देण्यात आली आहे. पाच लाख सोलरपंप बसविण्यात आले आहेत. यासह दुष्काळासाठी आवश्यक असणाऱया तात्पुरत्या आणि जलयुक्त शिवार या सारख्या कायम स्वरूपी योजना राबविण्यात येत आहेत. जास्तीत जास्त शेतकऱयांना मदत व्हावी म्हणून निकष बदलण्यात येत आहे. दुष्काळाबाबत सरकार सकारात्मक आणि संवेदनशिलपणे काम करते आहे, असेही आमदार अॅड आशिष शेलार यांनी सांगितले.