सरकार विरोधात आंदोलने करायची नाहीत तर काय सरकारची आरती अोवाळायची का ?' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सरकार विरोधात आंदोलने करायची नाहीत तर काय सरकारची आरती अोवाळायची का ?'

Share This
मुंबई: १३ सप्टेंबर - राज्यातल्या दुष्काळाने गांजलेला शेतकरी टाचा घासून आत्महत्या करत असतानाही त्याला मदत न करता निष्क्रीय बसून राहिलेल्या राज्य सरकार विरोधात आंदोलने करायची नाहीत तर काय सरकारची आरती अोवाळायची का? असा संतप्त सवाल राष्‍ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मा. श्री. सचिन अहिर यांनी केला आहे. तसेच मुंबईत बसून ज्यांना दुष्काळाची तीव्रता कळत नाही, असे नेते आमच्या आंदोलनाबद्दल काय बोलतात ती वायफळ बडबड म्हणजे मनोरंजनाचा एक उत्तम नमुना आहे. अशीच पोकळ बडबड त्यांनी दहिहंडी उत्सवादरम्यानही केली होती. बैठकांमागून बैठका घेत दहिहंडीचा प्रश्न सोडवल्याचा दावाही वारंवार केला होता. पण अखेर उत्सवाच्या दिवशी त्यांचे हे ढोंग उघडे पडले होते, असा सणसणीत टोला लगावत त्यांनी भाजपच्या टीकेचा समाचार घेतला.

ऑगस्ट महिन्यात मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरदचंद्र पवार साहेब यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेऊन मराठवाडयातील दुष्काळी परिस्थिती संदर्भात उपाययोजना करण्याची मागणी केली होती.त्याचवेळी दुष्काळाबाबतच्या उपाययोजना आणि दुष्काळी जनतेच्या मागण्या सरकारने मान्य न केल्यास १४ सप्टेंबरपासून जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तरीही दुष्काळाचे गांभीर्य न समजलेल्या या संवेदनाहीन आणि निष्क्रिय सरकारच्या विरोधात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जेलभरो आंदोलन करत अाहे. पक्ष नेतृत्वाच्या या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनेही दिनांक १४ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मा.श्री. सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात सकाळी अकरा वाजता जेलभरो आंदोलन केले जाणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages