अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव एका टॉक शोमधून भारतीय संविधानाचे विविध पैलू उलगडून सांगणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव एका टॉक शोमधून भारतीय संविधानाचे विविध पैलू उलगडून सांगणार

Share This
मुंबई : 1 Sep. 2015 आजच्या काळातील बंधुत्व आणि समानता या मानवी मूल्यांचा पुरस्कार करण्याची आत्यंतिक निकड आहे आणि त्याकरिता भारतीय संविधानाचे संपूर्ण ज्ञान असणे अनिवार्य ठरते. प्रतिथयश लेखक आणि विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी भारतीय संविधानाविषयी जागरुकता निर्माण करण्याकरिता एक अभिनव सामाजिक मोहिम सुरु केली आहे आणि त्याकरिता एका टॉक शोचे साहाय्य घेतले जाणार आहे. ’आपले संविधान, आपला आत्मसन्मान’ या टॉक शोमधून भारतीय जनतेला भारतीय संविधानाच्या विविध पैलूंची माहिती दिली जाणार आहे.

प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थितांना उद्देशून बोलताना डॉ. जाधव यांनी भारतीय लोकांना टॉक शोमधून संविधानात्मक/ कायदेशीर अधिकारांबद्दल जागरुक करण्याची इच्छा बोलून दाखवली. हा टॉक शो एकाच वेळी आघाडीच्या चार मराठी वाहिन्यांवर दाखवला जाणार असल्याने ऐतिहासिक ठरेल असेही मत डॉ. नरेंद्र जाधव यांनी नोंदवले. ते म्हणाले, "भारतीय संविधानाचा अभ्यास हा विविध अभ्यासक्रमांचा भाग असून आपल्या राष्ट्राचे कार्य त्यावरच चालते. असे असतानाही, आपल्यापैकी किती जणांना आपल्या मूलभूत अधिकारांची संपूर्ण माहिती आहे? आपण आपले मूलभूत अधिकार बजावले असे किती वेळा झाले? आपल्याला एखाद्या विषयाची माहिती नसली की त्याबद्दल माहिती घ्यायचे सोडून शासनाला जबाबदार धरणे कधीही सोपे असते, पण, लक्षात घ्या की, शासन आपली कार्ये पार पाडण्याकरिता जबाबदार असतेच पण भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार सक्षमपणे वापरता येण्याची क्षमता अंगी बाळगणे आणि आपल्याभोवतालच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणणे ही आपली देखील जबाबदारी आहे."

डॉ. जाधव म्हणाले, "भारतीय जनतेला, विशेषतः तरुण वर्गाला भारतीय संविधानाची इत्यंभूत माहिती करुन देणे हे या टॉक शोचे उद्दीष्टय आहे. भारतीय संविधानाने हिंदू, मुस्लिम, बुद्ध, ख्रिस्ती, जैन आणि इतर अनेक धर्माच्या लोकांना एकत्र आणले आहे हे आपण कधीही विसरता कामा नये. त्याचकरिता प्रत्येक सुजाण भारतीय नागरीकाला संविधानाची प्राथमिक माहिती असणे अनिवार्य ठरते."

या टॉक शोचे प्रसारण दर रविवारी होणार असून त्याचे सूत्र संचालक खुद्द डॉ. नरेंद्र जाधव आहेत. या टॉक शोमध्ये भारताच्या माजी राष्ट्राध्यक्षा प्रतिभा ताई पाटिल; भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे पी. बी. सावंत,  विकास शिरपूरकर आणि हेमंत गोखले यांच्यासारखे माजी न्यायाधीश आणि विविध ख्यातनाम वकील, सामाजिक कार्यकर्ते व चळवळकर्ते यांच्यासारखे मान्यवर सहभागी होणार आहेत.  या टॉक शोमध्ये प्रत्यक्ष उपस्थित असलेल्या प्रेक्षकगणासमोर मान्यवरांची चर्चा सत्रे रंगणार आहेत. प्रेक्षकांमध्ये विद्यार्थ्यांचा जास्त भरणा असेल यावर लक्ष पुरवले जाईल. या टॉक शोच्या काही भागांमध्ये नेहमीच्या चर्चासत्रांना बगल देऊन विषय तपशीलवारपणे आणि रंगतदारपणे समजावून सांगण्याकरिता न्यायालयातील विविध प्रकरणांचे संक्षिप्त लघुपट, चित्रफिती दाखवल्या जातील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages