मुंबई / प्रतिनिधी / १ सप्टेंबर २०१५
मुंबईच्या कांदिवली येथील बिहार टेकडी येथील कमलेश प्रसाद चाळ या बैठ्या चाळी मध्ये तळ मजला अधिक एक मजला घरामध्ये सकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी सिलेंडरचा स्फोट झाला. या स्फोटात आणखी एका सिलेंडर व घरगुती समान व इलेक्ट्रिक सामानाला आग लागली. हि आग सकाळी ७ वाजता विद्युत प्रवाह खंडित करून बदलीच्या सहाय्याने आग विझवण्यात आली असली तरी या दुर्घटनेत कृष्णकांत झा (४५ ) यांचा मृत्यू झाला असून ब्रम्हनंद झा (२४), रिकी झा (२६), शिवानंद झा (१३), बाळाकांत झा (३६), विनोद मिश्रा (४५), नेहा मिश्रा (१७), विभा मिश्रा (४५), गेंदा झा (४०), गणेश शुक्ला (२१), फुलकांत झा (५०) हे १० लोक जखमी झाले आहेत. या जखमींना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
