मगरींच्या भीतीमुळे पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदारांची कोटींची बोली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मगरींच्या भीतीमुळे पवई तलावाच्या स्वच्छतेसाठी कंत्राटदारांची कोटींची बोली

Share This

मुंबई 31 ऑगस्ट 2015
मिठी नदी पुनर्जीवित करण्यासाठी कोटय़वधींचा खर्च झाल्यानंतर आता प्रदूषित पवई तलाव स्वच्छ करण्याची योजना महापालिका राबवनार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीपुढे सादर करण्यात आला आहे.
पवई तलावामधील सांडपाण्याचा प्रवाह थांबवण्यात महापालिकेला यश आलेले नाही. आता तलावांमधील जलपर्णी वनस्पतींसह कचरा उचलण्यासाठी सव्वासात कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.या तलावांमध्ये मगरी असल्यामुळे जोखमीचे कारण पुढे करत कंत्राटदारांनी कंत्राटाची कोटींची बोली लावली आहे.


पवई तलाव हे मुंबईच्या सौंदर्यात भर पाडणारे असले तरी या तलावामध्ये गटा राचे आणि मलवाहिन्याचे सांडपाणी सोडण्यात येते यामुळे हा तलाव प्रदूषित होत असून यातील जीवसृष्टी नष्ट होत आहे.
तलावाची निगा राखून त्याचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी तसेच तलावातील जैवविविधतेचे संगोपन आणि संवर्धन करत पवई तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा धोरणात्मक निर्णय महापालिकेने घेतला आहे.

या तलावाचे संपूर्ण सर्वेक्षण, बेथीमेट्री सर्वेक्षण तसेच तलावाच्या तळाशी जमा झालेल्या गाळाचे नमुने गोळा करून त्यांची तपासणी व शास्त्रीय अभ्यास करण्याचे काम भारतीय प्राद्योगिक संस्था (आयआयटी) यांच्यामार्फत करण्यात येते.

पवई तलावात होणारा सांडपाण्याचा निचरा कमी करण्यात यश आल्याचा दावा प्रशासनाने केला असून पुढील काळात पवई तलावात होणारा दूषित पाण्याचा निचरा पूर्णपणे कमी करण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
तलाव स्वच्छतेबाबत पुढील नियोजन व दिशा ठरवण्यासाठी महापालिका आयुक्त (प्रकल्प) यांच्या अध्यक्षतेखाली पवई तलाव पुनरुज्जीवन समिती गठीत करण्यात आली आहे. त्यांनी सुचवल्याप्रमाणे जलपर्णी वनस्पती हटविण्यात येत आहेत. याबाबतचे कंत्राट किंजल कन्स्ट्रक्शन कंपनीला साडेसात कोटींना देण्यात आले आहे.

तलावात मगर असल्यामुळे वनस्पती काढण्यात जास्त खर्च येत असून जोखमीच्या व तलावातील पाण्यात काम करायचे असल्यामुळे मजुरीचा खर्च अधिक येत असल्यामुळे कमी बोली लावणा-या सव्वासात कोटींच्या कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. हा प्रस्ताव बुधवारच्या स्थायी समिती बैठकीपुढे सादर करण्यात आला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages