नगरसेवक सिरील डिसोझा यांना लाच घेताना अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

नगरसेवक सिरील डिसोझा यांना लाच घेताना अटक

Share This
मुंबई : मालवणी, मालाड (प.) येथील वॉर्ड क्रमांक ४४ चे नगरसेवक सिरील डिसोझा यांच्या वतीने फिर्यादीच्या मोकळ्या जागेला कंपाऊंड घालण्याच्या कामाला परवानगी देण्यासाठी एकूण ५ लाखांच्या लाचेची मागणी केली होती. मात्र फिर्यादीने एसीबीकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार सोमवारी एसीबीने लावलेल्या सापळ्यात नगरसेवक सिरील डिसोझाच्या वतीने लाच स्वीकारणार्‍या सिद्दीक युसूफ अन्सारी या इसमासह नगरसेवक सिरील डिसोझाला ५0 हजारांच्या लाचेच्या रकमेसह पकडण्यात आले. 
यातील फिर्यादी यांची मालाड (प.), मालवणी, रोठोडी गाव, साब्रीया मशीद, आझमी नगर या ठिकाणी मोकळी जागा आहे. या जागेस कुंपण घालावयाचे होते. तशा परवानगी मिळवून देण्यासाठी वॉर्ड क्रमांक ४४ चे स्थानिक नगरसेवक सिरील पिटर डिसोझा (४७) याने खाजगी इसम सिद्दीक युसूफ अन्सारी (३९) याच्यामार्फत १ लाख रुपयांची तसेच पी/उत्तर इमारत व कारखाने विभागाच्या मनपा अधिकार्‍यांसाठी ५ लाख रुपये लाचेची मागणी केली. फिर्यादीला लाच देण्याची इच्छा नसल्याने या प्रकरणी एसीबीकडे (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग) तक्रार दाखल केली. सोमवार, ३१ ऑगस्ट रोजी एसीबीच्या पथकाने मालवणी येथील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यालयाजवळ सापळा लावून नगरसेवक सिरील डिसोझा याच्या सांगण्यावरून लाचेचा पहिला हप्ता म्हणून ५0 हजार रुपये स्वीकरणार्‍या सिद्दीक अन्सारी व नगरसेवक सिरील डिसोझा याला रंगेहाथ पकडण्यात आले. यापूर्वीदेखील एसीबीच्या वतीने नगरसेवक सिरील डिसोझा याच्याविरोधात गुन्हा दाखल असून हा गुन्हा न्यायप्रविष्ट आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages