मुंबई,गुरुवार ( प्रतिनिधी ) - गणेशशोत्सव काळात लालबागमधील गर्दीचा विचार करून करीरोडचा पूल १२ सेप्टेम्बरला खुला करण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यासंबंधिचे पत्र त्यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनील अहिर यांना पाठविले आहे.
मोनोरेलच्या टप्पा दोनमध्ये संत गाडगे महाराज चौक (सातरस्ता) ते वडाला या कामासाठी गेल्या अनेक महिन्यापासून जास्त काळ वाहतुकीसाठी बंद कण्यात आला आहे. गणेशशोत्सव काळात या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने सदर पूल वाहतुकीसाठी खुला करावा , अशी मागणी राष्ट्रवादीकडून आंदोलन करून केली होती. त्यानुसार १९ ऑगस्टला त्यांनी एमएमआरडीए ला पत्र पाठविले होते. या पत्रावर उत्तर देताना कारीरोडचा पूल १२ सेप्टेम्बरला खुला करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएने पत्राद्वारे सुनील अहिर यांना कळविले आहे.
सदर मोनोरेलचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून करीरोड येथील कामासाठी करीरोड उड्डाण पूल बंद ठेवण्यात आला होता. एमएमआरडीएतर्फे लौन्चींगचे काम पूर्ण झाले असून मध्य रेल्वेने ६ सेप्टेम्बरला मेगाब्लॉक करून सदर काम पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे.