"नालेसफाईच्या चौकशी अहवालाने "करून दाखवले ' म्हणणाऱ्यांचे बिंग फुटले' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

"नालेसफाईच्या चौकशी अहवालाने "करून दाखवले ' म्हणणाऱ्यांचे बिंग फुटले'

Share This

मुंबईतल्या गेल्या दहा वर्षांतल्या नालेसफाईची चौकशी करा - सचिन अहिर 

मुंबई सप्टेंबर-मुंबईतल्या नालेसफाईच्या चौकशी अहवालाद्वारे महापालिकेतीलसत्ताधाऱ्यांचे बिंग फुटले असून या चौकशी अहवालाच्या माध्यमातून त्यांचा "करून दाखवलेहादावा फोल ठरला आहेइतकेच नव्हे तर नालेसफाईचा हा फक्त एका वर्षातला घोटाळा आहेमात्रगेल्या दहा वर्षांतील मुंबईतल्या नालेसफाईची चौकशी केल्यास यापेक्षाही अधिक मोठा घोटाळाबाहेर पडेलअसे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष माश्रीसचिन अहिर यांनी गेल्या दहावर्षांतील मुंबईतल्या नालेसफाईची चौकशी करण्याची मागणी केली आहेतसेच नालेसफाईकरणाऱ्या या कंत्राटदारांच्या डोक्यावर कुणाचा वरदहस्त आहेयाचीही विशेष चौकशी पथकाद्वारेनिष्पक्ष चौकशी कराअशीही मागणी त्यांनी केली.


दरवर्षीप्रमाणे यंदाही महापालिकेने पावसाळ्यापुर्वी समाधानकारक नालेसफाई झाल्याचा दावाकेला होतातरीही पहिल्याच पावसात या वर्षी अवघी मुंबई जलमय झाली होतीया मुद्द्यावरूननालेसफाईच्या कामामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत या कामाची चौकशी करण्याचीमागणी राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच विरोधकांनी लावून धरली होतीत्या मागणीची दखल घेतमुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात नालेसफाईची चौकशी करण्याचे आदेश मुंबईमहापालिकेच्या आयुक्तांना दिले होतेत्यानुसार चौकशी पुर्ण करत महापालिका आयुक्त अजोयमेहता यांनी बुधवारी हा चौकशी अहवाल स्थायी समिती अध्यक्षांकडे सुपूर्द केलामात्र हा अहवालउघड झाला तर आपण अडचणीत येऊहे लक्षात आल्यानेच तो अहवाल स्थायी समितीअध्यक्षांनी दाबून ठेवल्याचा आरोप करत माअहिर यांनी हा अहवाल जनतेसमोर उघडकरण्याची मागणी केली.

नालेसफाईच्या कामातल्या या भ्रष्टाचाराला महापालिका प्रशासन तर जबाबदार आहेचपणत्यापेक्षा अधिक या भ्रष्टाचाराला सत्ताधारी जबाबदार आहेतसत्ताधाऱ्यांच्या संगतमताशिवायकंत्राटदार हा भ्रष्टाचार करूच शकले नसतेअसे सांगत या कंत्राटदारांचे सत्ताधाऱ्यांपैकी कोणाशीलागेबांधे आहेत याचाही खुलासा होण्याची गरज असल्याचे माअहिर म्हणालेतसेच हा अहवालघेऊन नुसताच थंड बस्त्यात ठेवू नकात्यात दोषी आढळलेल्यांवर कारवाई कराअशी मागणीहीत्यांनी यावेळी केली.
 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages