बेस्टच्या विद्युत देयके बँकेमध्येही भरण्याची सुविधा उपलब्ध करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टच्या विद्युत देयके बँकेमध्येही भरण्याची सुविधा उपलब्ध करा

Share This
मुंबई 3 सप्टेंबर २०१५ ( प्रतिनिधी ) - बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने विद्युत देयकांचा भरणा करण्याची सुविधा राष्ट्रीयकृत व सहकारी बँकामध्ये उपलब्ध करून देण्यात यावी अशी ठरावाची सुचना नगरसेविका सरिता पाटील यांनी केली आहे. 

बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाच्या विधुत देयके भरण्याच्या केंद्रांची संख्या कमी असल्यामुळे उपलब्ध असलेल्या सदर केंद्रांच्या ठिकाणी नागरिकांना विद्युत देयके भरण्यासाठी तासनतास प्रतिक्षा करावी लागत आहे.  त्यातच विभागनिहाय विद्युत देयके भरण्याची अंतिम तारीख एकाच दिवशी आल्यास संबंधित विभागातील विद्युत देयके भरणा केंद्रावर देयके भरण्यासाठी ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागतात. शिवाय सदर भरणा केंद्राच्या ठिकाणी शेडची व्यवस्था नसल्यामुळे उन - पावसात नागरिकांची प्रचंड गैरसोय होते.  ही वस्तूस्थिती लक्षात घेता पालिकेने बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमाने विद्युत देयकांचा भरणा करण्याची सुविधा राष्ट्रीय कृत व सहकारी बॅकामध्ये उपलब्ध करून दयावी अशी ठरावाची सूचना नगरसेविका सरिता पाटील यांनी केली आहे ही ठरावाची सुचना पालिका सभागृहाच्या मंजुरी नंतर त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages