मुंबई २ सप्टेंबर २०१५ ( प्रतिनिधी ) इमामवाडा (साबू सिध्दिकी) प्रसूतीगृहाच्या रिक्त वास्तूचा ताबा सदरहू संस्थेने १० सप्टेंबर २०१५ पर्यंत बृहन्मुंबई महापालिकेकडे न दिल्यास १४ सप्टेंबर २०१५ पासून सदर जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयाने जाहीर केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘बी’ विभागातील सीटीसर्वे नं. १८८३ (विभाग) इमामवाडा रोड, डोंगरी, मुंबई – ४०० ००९ ही वास्तू मेसर्स साबू-सिध्दिकी रुग्णालय, (इमामवाडा प्रसुतीगृह) यांना ( सार्वजनिक खाजगी प्रोत्साहन प्रकल्प धोरणातंर्गत) १० वर्षाकरिता प्रसूतीगृह सेवा चालविण्यासाठी २००४ साली देण्यात आली होती. सदर करार फेब्रुवारी २०१४ साली संपुष्ठात आला असून सदर संस्थेस कराराचे नूतनीकरण नाकारण्यात आले आहे. सदरहू संस्थेस सदर जागा रिकामी करण्याकरिता महानगरपालिकेच्या टर्मिनेशन नोटीसव्दारे मे २०१४ रोजी कळविण्यात आले होते. त्यानंतरही संस्थेच्या वैद्यकीय कर्मचारी वृंदातर्फे संदर्भित वैद्यकीय संस्थेमध्ये बाहयरुग्ण व आंतररुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत. सदर सुविधा १० सप्टेंबर २०१५ रोजी खंडीत करण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी आपली
गैरसोय टाळण्याकरिता आपल्या वैद्यकीय उपचारांसाठी पर्यायी व्यवस्था करुन बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे असे जाहिर करण्यात येत आहे. अद्यापपर्यंतही सदरहू संस्थेने रिक्त वास्तूचा ताबा महापालिकेकडे दिला नसल्याने १४ सप्टेंबर २०१५ पासून सदर जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘बी’ विभाग कार्यालयाने जाहीर केले आहे.
