डोके ठिकाणावर ठेवून काम करा - न्यायालयांकडून पोलिसांची कानउघाडणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

डोके ठिकाणावर ठेवून काम करा - न्यायालयांकडून पोलिसांची कानउघाडणी

Share This
मुंबई : पोलीस कोठडीतील आरोपींच्या मृत्यूचे वाढते प्रमाण चिंतेचा विषय आहे.अशा प्रकारच्या घटना तातडीने थांबवा, असा आदेश देताना उच्च न्यायालयाने डोके ठिकाणावर ठेवूनच काम करा, असा शब्दात पोलिसांची कानउघाडणी केली. अँग्नेलो वल्डारिसचा वडाळा पोलीस ठाण्याच्या कोठडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने पोलिसांच्या वर्तणुकीवर ताशेरे ओढले.
कोठडीतील मृत्यूचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने १0 महिन्यापूर्वी प्रत्यके पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही बस्विण्याबरोबरच रात्रीच्या वेळी होणारी इंट्रोगेशन थांबवण्याचे आदेश दिले होते.तसेच एप्रिल २0१४ मध्ये वडाळा पोलिसांच्या कोठडीत असताना मरण पावलेल्या अँग्नेलो वल्यारिसच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. न्या.व्ही. एम. कानडे आणि न्या. शालिनी फणसाळकर - जोशी यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली. सीबीआयने या प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्याची माहिती न्यायालयात दिली. गेल्या १४ वर्षांत १९९९ ते २0१३ या चौदा वर्षांच्या काळात ३३३ जणांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. त्यापैकी ४५ गुन्हे दाखल झाले आणि १९ गुन्ह्यांत आरोपपत्र सादर झाली; परंतु कोणालाही शिक्षा झालेली नाही, अशी माहिती अँड़ युग चौधरी यांनी न्यायालयात दिली. या वेळी न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलीस कोठडीतील मृत्यूंचे प्रमाण वाढत असल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. तसेच रात्रीच्या वेळी होणारी तपासणी थांबवण्याचे आदेश देऊनही हे प्रकार का सुरू आहेत, असा सवाल उपस्थित करून न्यायालयाने हे प्रकार तातडीने थांबवा, असे पोलिसांना बजावले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages