आयकर न भरल्याने पालिकेला २०० कोटीचा दंड - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आयकर न भरल्याने पालिकेला २०० कोटीचा दंड

Share This
पालिकेच्या वित्त व लेखा विभागाच्या वादात पालिकेला भुर्दंड
हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून रक्कम वसूल करावी
स्थायी समितीत नगरसेवकांची मागणी

मुंबई  2 Sep. 2015 ( प्रतिनिधी ) -:  पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापून जाणारा आयकर पालिकेच्या फायनान्स विभागाने न भरल्याने आयकर विभागाने पालिकेला तब्बल २०० कोटीचा दंड आकारला आहे. दंड आकारूनही या विभागातील अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा सुरूच असल्याने आयकर विभागाकडून दंड व त्यावर व्याज आकारण्याची कारवाई सुरू आहे. कापून जाणारा कर कोणी भरावा याबाबत वित्त व आयकर विभागाचा वाद अद्याप मिटलेला नसल्याने पालिकेला कोट्यवधी रुपयाचा भुर्दंड सहन करावा लागतो आहे.


पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापून जाणारा आयकर पालिकेच्या फायनान्स विभागाने भरला नाही. त्यामुळे नियमानुसार आयकर विभागाने २००६ साली ७५ कोटी, २०१४-१५ ला १११ कोटी व यावर्षी २०१५ ला साडेसहा कोटी रुपये अशी एकूण दंडाची रक्कम व त्यावर व्याज मिळून २०० कोटीचा दंड आकारल्याची धक्कादायक माहिती देशपांडे यांनी स्थायी समितीत हरकतीचा मुद्दा मांडून समोर आणली. अशा हलगर्जीपणा करणाऱ्या पालिकेच्या या फायनान्स विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून ही रक्कम त्यांच्याकडूनच वसूल करावी अशी मागणी मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी बुधवारी स्थायी समितीत केली. या मागणीला सर्व नगरसेवकांनी पाठिंबा दिला. या मुद्द्यावर प्रशासनाला समाधानकारक उत्तर देता आले नाही. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कापून जाणारी रक्कम किती किती आहे, ती का भरली नाही, नेमकी अडचण काय आहे याबाबत   येत्या स्थायी समितीत प्रशासनाकडून खुलासा होईपर्यंत हा विषय राखून ठेवण्यात आला आहे. दरम्यान, दोन्ही विभागाच्या वादात कर्मचाऱ्यांच्या वेतनातील कापून जाणारा आयकर भरलेला नाही, मग मालमत्ता करावरील टॅक्स तरी आयकर विभाकडे भरला जातो का? यावरही आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages