निर्माल्यापासून महापालिका करणार खत निर्मीती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 September 2015

निर्माल्यापासून महापालिका करणार खत निर्मीती

६८५ टन निर्माल्यापासून तयार होणारे खत उद्यानांमध्ये वापरणार
मुंबई 28 Sep 2015 ( प्रतिनिधी ) -  यंदाच्या गणेशोत्सवामध्ये सुमारे ६८५ टन इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माल्य महापालिकेकडे जमा झाले होते. हे सर्व निर्माल्य महापालिकेच्या प्रशासकीय विभागांमध्ये असणा-या खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये हलविण्यात आले आहे. तसेच आता ह्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेस सुरूवातही झाली आहे. पुढील साधारपणे एका महिन्याच्या कालावधीत ह्या सर्व निर्माल्याचे रुपांतर सेंद्रिय खतामध्ये होईल.त्यानंतर हे तयार होणारे सर्व सेंद्रिय खत महापालिकेच्या उद्यानांमध्ये असलेल्या झाडांना खत म्हणून वापरण्यात येणार आहे. ही बाब लक्षात घेता गणरायाने जाता-जाता देखील मुंबईकरांना दिलेले आगळे वेगळे आशिर्वाद महापालिकेच्या उद्यानांमधून बहरणार आहे असे पालिकेने पष्ट केले आहे


लाखो मुंबईकरांचे श्रध्दास्थान असणा-या गणपती बाप्पाला मुंबईकरांनी काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी अत्यंत भावपूर्ण निरोप दिला. याच गणपती बाप्पाने जाता-जाता मुंबईकरांना थोड्या वेगळ्या स्वरुपातील आशिर्वाद दिले आहेत ! हे आशिर्वाद आहेत भक्तांनी गणरायाच्या चरणी वाहिलेल्या फुलांचे, पानांचे गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या काळात लाखो मुंबईकरांनी गणपती बाप्पाच्या चरणी फुले, पाने, दूर्वा वाहून आपले श्रध्दा सुमन अर्पित केले होते. बृहन्मुंबई महापालिकेने भक्तांच्या या भावनेचा आदर करीत गणरायाच्या चर केणी वाहिलेल्या ह्या पाने, फुले, दूर्वा यांचा वेगळा विचार केला आणि त्यातून महापालिकेच्या विभाग स्तरावर निर्माल्यापासून सेंद्रीय खत निर्माण करणारे प्रकल्प यापूर्वीच आकारास आले आहेत.यंदाच्या गणेशोत्सवामध्ये सुमारे ६८५ टन इतक्या मोठ्या प्रमाणात निर्माल्य महापालिकेकडे जमा झाले होते. हे सर्व निर्माल्य महापालिकेच्या प्रशासकीय विभागांमध्ये असणा-या खतनिर्मिती प्रकल्पांमध्ये हलविण्यात आले आहे. तसेच आता ह्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करण्याच्या प्रक्रियेस सुरूवातही झाली आहे. पुढील साधारपणे एका महिन्याच्या कालावधीत ह्या सर्व निर्माल्याचे रुपांतर सेंद्रिय खतामध्ये होईल.त्यानंतर हे तयार होणारे सर्व सेंद्रिय खत महापालिकेच्या उद्यानांमध्ये असलेल्या झाडांना खत म्हणून वापरण्यात येणार आहे. ही बाब लक्षात घेता गणरायाने जाता-जाता देखील मुंबईकरांना दिलेले आगळे वेगळे आशिर्वाद महापालिकेच्या उद्यानांमधून बहरणार आहे  मुंबई शहराचे एक महत्वाचे आकर्षण असणारा गणेशोत्सव दि. १७ सप्टेंबर ते दि. २७ सप्टेंबर २०१५ दरम्यान साजरा करण्यात आला. या उत्सवादरम्यान मुंबई शहर व उपनगरात घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये निर्माण होणारे निर्माल्य गोळा करण्यासाठी २५६ निर्माल्य कलश पुरविण्यात आले होते. त्याचबरोबर हे निर्माल्य गोळा करुन खत निर्मीती प्रकल्पाच्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी १,१४६ टेम्पोंची व्यवस्था करण्यात आली होती.त्याचबरोबर विसर्जन स्थळी व लगतच्या परिसराची साफसफाई करण्यासाठी अशासकीय संस्थांकडून सरासरी ६३१ कामगारांची व्यवस्था दैनिक स्वरुपात करण्यात आली होती.  तसेच विसर्जन स्थळी व लगतच्या परिसरात जमा होणारा कचरा वाहून नेण्यासाठी २९४ अतिरिक्त वाहनांच्या सेवा (डम्पर्स) पुरविण्यात आल्या होत्या  गणेशोत्सवाच्या कालावधीत महापालिकेच्या सर्व २४ विभागांमधून जमा केले आहे     

Post Bottom Ad

JPN NEWS