महापालिका एड्स नियंत्रण संस्थेला बिनव्याजी 8 कोटी रुपये देणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 September 2015

महापालिका एड्स नियंत्रण संस्थेला बिनव्याजी 8 कोटी रुपये देणार


मुंबई / 28 Sep 2015 / अजेयकुमार जाधव 
मुंबई महानगर पालिका एड्स नियंत्रण संस्थेला परत फेडीच्या तत्वावर बिनव्याजी 8 कोटी रुपये देणार आहे. तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे.


मुंबई महानगर पालिकेच्या सन 2015-16 च्या अर्थसंकल्पामधून मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेला परत फेड़ीच्या तत्वावर 8 कोटी रुपये रक्कम बिनव्याजी उपलब्ध करावे अशी आयुक्तानी विनंती केली.
मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेने 2015-16 करिता भारत सरकारच्या राष्ट्रिय एड्स नियंत्रण संघटनेकडून 3792.89 लाखांची मागणी केली आहे. या मागणी पैकी 80 टक्के अनुदान वितरित केले जाणार आहे. या अनुदानामधे राज्य सरकारचाही हिस्सा आहे. याप्रकरणी राज्य आणि केंद्र सरकार मधे विचार विनिमय सुरु आहे.

मुंबई एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत 475 कंत्राटी व् 3 प्रतिनियुक्तीवर अधिकारी कार्यरत आहे. 48 लक्ष्य गट प्रकल्प, ब्लड बँका, इत्यादी आस्थापना कार्यरत आहेत. निधी नसल्याने संस्था चालवने जिकिरिचे झाले असून गेल्या 3 महिन्यापासून संस्थेची बिले प्रलंबित आहेत. केंद्र सरकारकडून निधी मिलन्यास वेळ लागणार असल्याने बिनव्याजी 8 कोटी रुपये परत फेडीच्या तत्वावर मंजूर करावे असा प्रस्ताव आयुक्तानी स्थायी समिती पुढे सादर केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages