डेंग्यूची उत्पत्तीस्थाने आढल्यामुळे १३ हजार नोटिसा - २३ लाख रुपये दंड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 September 2015

डेंग्यूची उत्पत्तीस्थाने आढल्यामुळे १३ हजार नोटिसा - २३ लाख रुपये दंड

मुंबई : अभिनेता अनिल कपूर, जुही चावला, जितेंद्र आणि अमित कुमार यांच्या घरात डेंग्यूची उत्पत्तीस्थाने आढळल्यानंतर यश चोपडा, आर. के. स्टुडिओ, अधिकारी ब्रदर्स आणि दिग्दर्शक बी. आर. चोपडा यांच्या घरातही डेंग्यूच्या अळ्या सापडल्याने पालिकेचे कीटकनाशक अधिकारी चक्रावले आहेत. कीटकनाशक विभागाने या सर्वांना नोटिसा बजावल्या आहेत.
 
पालिकेचा सार्वजनिक आरोग्य विभाग आणि कीटकनाशक विभागाने ही मोहीम हाती घेतली असून गुरुवारी पालिकेने अंधेरी, वांद्रे, पाली हिल, जुहू, ओशिवरा, चेंबूर येथे राहणार्‍या 'बॉलीवूड स्टार'च्या पाहणी केली. त्यात आर.के., अधिकारी ब्रदर्स आणि यश चोप्रा यांच्या स्टुडिओत व बी. आर. चोप्रा यांच्या घरातही डेंग्यूच्या अळ्या सापडल्यामुळे पालिकेने त्यांना नोटीस बजावून खुलासा करण्यास सांगितले आहे. डॅनी, अनुपम खेर, सोनाली बेंद्रे, अजय देवगण, धर्मेंद्र, हेमामालिनी यांच्या घराचीही तपासणी केली असता, त्यांच्या घरात मात्र डेंग्यूचा एकही डास आढळला नाही.

डेंग्यूची उत्पत्तीस्थाने आढल्यामुळे पालिकेने १ जानेवारी ते ३१ ऑगस्टपर्यंत १३ हजार ५८७ रहिवाशांना आणि आस्थापनांना नोटिसा बजावल्या आहेत. तरीही त्याची दखल न घेतलेल्या ८६६ जणांवर न्यायालयात दावे केले आहेत. आणि न्यायालयीन कारवाई करून २३ लाख ३८ हजार ४00 रुपये दंड रक्कम आकारला आहे. जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान ६२ लाख ७५ हजार २४७ घरांची तपासणी केली असून त्यापैकी ५६११ ठिकाणी डासांची उत्पत्तीस्थाने आढळली. ८0 टक्के उत्पत्तीस्थाने रुग्णांच्या घरात किंवा घराजवळ आढळली आहेत. सप्टेंबरमध्ये १९५३ उत्पत्तीस्थाने शोधून नष्ट करण्यात आली. १८0 उत्पत्तीस्थाने झोपड्यांत आढळून आली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages