संक्रमण शिबिरांना घुसखोरांना हटवण्यासाठी म्हाडाने कंबर कसली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

संक्रमण शिबिरांना घुसखोरांना हटवण्यासाठी म्हाडाने कंबर कसली

Share This
मुंबई- म्हाडाच्या संक्रमण शिबिरांमधील घुसखोरांना हटवण्यासाठी म्हाडाने कंबर कसली आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यापासून संक्रमण शिबिरांची म्हाडाद्वारे झाडाझडती केली जाणार आहे. शहर, उपनगरात असणा-या संक्रमण शिबिरात सद्यस्थितीत किती घुसखोर आहेत याचा आढावा घेतला जाणार असून पोलिसांच्या मदतीने कारवाई मोहीम राबवली जाणार असल्याचे म्हाडाच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. घुसखोरांनी घरात पुन्हा शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.

म्हाडाच्या ‘मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळा’च्या अखत्यारित शहर, उपनगरात ५६ संक्रमण शिबिरे आहेत. या संक्रमण शिबिरात २१ हजार १३५ संक्रमण गाळे आहेत. संक्रमण शिबिरातील घुसखोरी ही वेळोवेळी निदर्शनास आली आहे. याबाबत म्हाडाद्वारे वेळोवेळी कारवाईसुद्धा केली गेली. मात्र या कारवाईला न जुमानता दलाल, भ्रष्ट अधिका-यांसोबत हातमिळवणी करत हजारो घुसखोर संक्रमण शिबिरात गेल्या अनेक वर्षापासून राहत आहेत. या घुसखोरांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी म्हाडाने हालचाली सुरू केल्या आहेत.

शासनाच्या नियमाप्रमाणे पावसाळ्यात घुसखोरांना घराबाहेर काढता येत नाही. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यापासून संक्रमण शिबिरात राहणा-या घुसखोरांवर कारवाईची प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचे ‘मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळा’चे मुख्य अधिकारी एस. भांगे यांनी सांगितले. कारवाई केल्यानंतरही घुसखोरी कराताना आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील. संक्रमण शिबिरातील गाळ्यांमध्ये घुसखोरी होण्यापासून रोखण्यासाठी खासगी सुरक्षारक्षकांचे सहकार्य घेण्याचे विचाराधीन आहे. 

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages