दुर्गम भागातील मतदारांसाठी लवकरच इंटरनेटवरून मतपत्रिका - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दुर्गम भागातील मतदारांसाठी लवकरच इंटरनेटवरून मतपत्रिका

Share This
नवी दिल्ली : दुर्गम भागातील लोकांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी निवडणूक आयोगाच्या सहकार्याने माहिती-तंत्रज्ञान विभाग ई-टपाल मतपत्रिका यंत्रणा विकसित करत आहे. या प्रणालीच्या साहाय्याने लवकरच दुर्गम भागातील मतदारांना इंटरनेटच्या माध्यमातून मतपत्रिका पाठवणे आणि टपालाद्वारे त्यांचे मत स्वीकारणे शक्य होणार आहे.

दूरसंचार आणि माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयातील एका अधिकार्‍याने सांगितले की, विकसित करण्यात येत असलेली यंत्रणा अतिदुर्गम भागात राहणार्‍या मतदारांना मतपत्रिकेची ई-डिलिव्हरीची सुविधा प्राप्त करून देईल. याअंतर्गत निवडणूक आयोगाकडून मतदारांना इंटरनेटवरून मतपत्रिका पाठविण्यात येईल. मतदारांना ही मतपत्रिका डाऊनलोड करून त्याची पिंट्र काढावी लागेल. मतदारांनी त्यांच्या आवडीच्या उमेदवारावर शिक्का मारल्यानंतर ती मतपत्रिका बंद पाकिटातून टपालाच्या मदतीने परत निवडणूक अधिकार्‍याकडे पाठवणे आवश्यक आहे. लष्करामध्ये कार्यरत असलेले मतदार, निवडणूक प्रक्रियेत सहभागी असलेले कर्मचारी आणि देशातील सर्व अधिकृत मतदारांना या यंत्रणेचा वापर करता येणार आहे.

दूरसंचार आणि माहिती-तंत्रज्ञान विभागाअंतर्गत असलेल्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अँडवान्स्ड कंप्युटिंग अर्थात 'सी-डॅक'कडून ई-पोस्ट मतपत्राच्या प्रणालीचा विकास केला जात आहे. सध्या सी-डॅक केवळ मतपत्रिका पाठविण्याची एकतर्फी सुविधा पुरवत आहे. मात्र, लवकरच मतपत्रिका पाठवणे आणि परत मिळवण्याची दुहेरी यंत्रणा कार्यान्वित होईल. 'सी-डॅक'कडून विकसित करण्यात येत असलेल्या या प्रणालीचा वापर एका सुरक्षा समितीच्या आढाव्यानंतर केला जाईल.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages