मुंबई : आर्थिक तोट्यात सापडलेल्या बेस्ट प्रशासनाने प्रवासी भाडे वाढल्याने लाखो प्रवाश्यांनी बेस्टकडे पाठ फिरवली होती. या लाखो प्रवाश्यांना आपल्याकडे पुन्हा आकर्षित करण्यासाठी बेस्ट प्रशासनातर्फे मुंबई शहरासाठी ४0 रुपये, तर उपनगरासाठी ५0 रुपयांची दैनिक बसपास योजना आणली आहे. हि योजना ( १६ सप्टेंबर ) बुधवारपासून अमलात आणण्यात येणार आहे. बेस्ट समितीमध्ये सोमवारी या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देण्यात आली आहे.
बेस्टने काही महिन्यांपूर्वी झालेल्या भाडेवाढीत दैनंदिन बसपासाची रक्कम ७0 रुपयांपर्यंत वाढवली होती. मात्र त्यास कमी प्रतिसाद मिळाल्यानंतर बेस्टने शहरासाठी ५0, तर उपनगरासाठी ४0 रुपयांची पास योजना तयार केली होती. त्यात शहराबाहेर जाणार्या प्रवाशांसाठी ७0 रुपयांचा तिकीटदर निश्चित केला आहे. तसेच मॅजिक पासेस (नॉन एसी बेसेस) मधील अर्मयादित मासिक पासची रक्कम १७00 रुपयांवरून ९७५, तर उपनगरासाठी १२00 रुपये करण्यात आली आहे. त्रैमासिक मॅजिक पासासाठी शहरी भागातील प्रवासाची रक्कम २८२५, तर उपनगरासाठी ३४५७ रुपये इतकी झाली आहे. किडनीच्या उपचारासाठी ये-जा करणार्या प्रवाशांसाठी बेस्टच्या बसच्या पुढच्या दाराने चढता-उतरता येण्याची मुभा बेस्ट प्रशासनाने दिली आहे. या सोयीसाठी त्या प्रवाशांना डॉक्टरचे तसे सर्टिफिकेट सोबत घ्यावे लागणार आहे. बेस्टच्या दैनंदिन बसपासचे दर कमी झाल्यामुळे बेस्टला पुन्हा प्रवासी मिळू शकतील, असा विश्वास या वेळी बेस्ट समिती सदस्य अरविंद दुधवडकर यांनी व्यक्त केला.