बेस्टकडून २४४ मंडळांचे अर्ज नामंजूर तर ३९३मंडळांचे अर्ज मंजूर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टकडून २४४ मंडळांचे अर्ज नामंजूर तर ३९३मंडळांचे अर्ज मंजूर

Share This
मुंबई १४ सप्टेंबर २०१५  - मुंबई शहरातील एकूण ५४१ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी बेस्टकडे वीज  पुरवण्यासाठी अर्ज सादर केले आहेत . यातील ३९३ अर्ज  मंजूर करण्यात आले असून २४४ मंडळानी योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे ते अर्ज बाद ठरवण्यात आले . आतापर्यत बेस्टने ७८ मंडळांना विजमापक जोडण्यात  आले असल्याची माहिती बेस्ट ने दिली अहे. 

सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून दरवर्षी गणेशोस्तव मंडळांना वीजचोरी न करता रीतसर परवानगी मागण्याचे आवाहन केले आहे . मात्र तरीही काही मंडळे वीज चोरी करीत असतात . गेल्या पाच वर्षात १३७ सार्वजनिक गणेशोत्सव  मंडळांनी वीजचोरी केल्याचे बेस्टने उघड केले होते . त्यांच्यावर एकूण ५ लाख १४ हजार ३७२ रुपये दंडाचा दावा बेस्टने केला होता . गेल्यावर्षी बेस्टकडून १३३२ गणेशोत्सव मंडळांना  बेस्टकडून वीज पुरवठा करण्यात आला होता . त्यावेळी एकूण १५ हजार ४३५ जोडण्या दिल्या होत्य. यातून बेस्टला २८ लाख ५९ हजार ३०९ रुपये मिळाले होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages