मुंबई : पावसाने गेल्या दोन ते तीन दिवसांत तलावक्षेत्रात समाधानकारक हजेरी लावल्यामुळे मोडक सागर धरणाचे दरवाजे रविवारी दुपारी ३.२0 वाजता उघडण्यात आले आहेत. मुंबईला पाणीपुरवठा करणार्या तानसा, मध्य वैतरणा आणि अप्पर वैतरणा यासह इतर तलावांमधील जलसाठय़ात वाढ झाली आहे. यामुळे मुंबईवरील पाणी कपातीचे संकट टळण्याची शक्यता आहे.
मुंबईला मोडक सागर, तानसा, विहार, तुलसी, अप्पर वैतरणा, भातसा आणि मध्य वैतरणा या तलावांतून पाणीपुरवठा करण्यात येतो. यंदा जून महिन्यात जोरदार बरसलेल्या पावसाने जुलै आणि ऑगस्ट महिन्यात दांडी मारल्यामुळे पाणी कपातीचे संकट निर्माण झाले आहे. सध्या सर्व जलाशयांमध्ये १0,४४,२५८ हजार दशलक्ष जलसाठा उपलब्ध आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणार्या जलाशयांत आणखी चार लाख दशलक्ष लिटर्स पाणीसाठा जमा झाल्यास सध्याची पाणी कपात मागे घेण्याचा विचार करता येईल, असे एका अधिकार्याने सांगितले. गेल्या वर्षी याच काळात १४ लाख दशलक्ष लिटर जलसाठा उपलब्ध होता. तुळशी धरणाची क्षमता १३९.१७ दशलक्ष लिटर एवढी आहे. सध्या तुळशीमध्ये १३८ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा झाला असून, पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी फक्त १.१७ मीटर पाणीसाठा हवा आहे तसेच विहारची पूर्ण क्षमता ८0.१२ दशलक्ष असताना त्यात ७६.९४ दशलक्ष लिटर पाणीसाठा जमा आहे. हा जलाशय पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी फक्त तीन मीटर पाणीसाठा आवश्यक आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास हे दोन्ही जलाशय 'ओव्हरफ्लो' होतील. परतीच्या पावसाने महिन्याच्या अखेरपर्यंत हजेरी लावल्यास ४ लाख लिटर जलसाठय़ाची कमतरता भरून निघेल आणि मुंबईवरील पाणी कपात दूर होईल.