दोषी कंत्राटदार अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करा
मुंबई / प्रतिनिधी / 3 सप्टेंबर 2015
मुंबईमधे जून महिन्यात मुसळधार पावसामुले मुंबई तुम्बली होती. नाले सफाई चांगली झाली नसल्याने मुंबई तुम्बली असा आरोप झाल्यावर चौकशी समितीने दिलेल्या अहवालात कंत्राटदार दोषी असल्याचे उघड होताच कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी करतानाही सत्ताधाऱ्यामधे एकमत नसल्याचे उघड झाले आहे.
नालेसफाई करताना आम्ही नालेसफाई होताना पाहिली पण ज्या गाड्या गाळ घेवून जात होत्या त्याच गाड्या पुन्हा इतर कंत्राटदारांचा गाळ उचलत असल्याचे दाखवत होते याची आम्हाला माहीत नव्हते असे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी सांगितले. तर भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी आम्ही पहिल्या पासून नालेसफाईमधला गाळ किती प्रमाणात काढला जातो याची नोंद योग्य रित्या दिसत नसल्याने याची चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे कोटक यांनी सांगितले.
आयुक्तांनी सादर केलेल्या अहवालात एकच वाहन अनेक कंत्राटदार गाळ टाकण्यासाठी वापरात आल्याचे म्हटले आहे, वाहनामधे असलेल्या जीपीएस ट्रयाकिंग सिस्टम कामच करत नव्हती, गाळ ज्या ठिकाणी टाकला त्या जमीन मालकानी चौकशी समितीला सहकार्य केलेले नाही, गाळ नेनार्या गाड्यांचे लॉग शिट कोरे आढळले आहेत, काही वेला गाळ नेणारा ट्रक 20 मिनिटात पुन्हा गाळ भरण्यासाठी आल्याची नोंद आहे, गाळ आणि नालेसफाई यांचे थर्ड पार्टी ऑडिट केलेले नाही, गाळ नेणार ट्रक मुंबईबाहेर गेल्याचे टोल नाक्यावरिल सिसि टिव्ही फुटेज उपलब्ध झालेले नाहित अश्या अनेक त्रुटी आणि चुका असल्याचे अहवालात म्हटले आहे.
54 पैकी 9 कंत्राटदारांच्या बाबतीत असे प्रकार आढळले आहेत. यामुले सर्व 9 कंत्राटदाराना काळ्या यादीत टाकुन एफआयआर दाखल करावा, दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी यशोधर फणसे यांनी केली आहे. तर कोटक यांनी कंत्राटदारावर आणि दोषी असलेल्या अधिकाऱ्यावर फौजदारी कारवाई करावी, 9 कंत्राटदार दोषी आढळले आहेत यामुले सर्वच 54 कंत्राटदारांची चौकशी करावी, पुढे असे प्रकार होऊ नए म्हणून पालिकेने तयारी करावी अशी मागणी कोटक यांनी केली आहे.
