पालिका बालाजी हार्ट हॉस्पिटलचा ताबा घेण्याची प्रक्रिया १४ सप्टेंबर २०१५ पासून सुरु करणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पालिका बालाजी हार्ट हॉस्पिटलचा ताबा घेण्याची प्रक्रिया १४ सप्टेंबर २०१५ पासून सुरु करणार

Share This

मुंबई / प्रतिनिधी / ४ सप्टेंबर २०१५
मेसर्स बालाजी हार्ट हॉस्पिटल ऍण्ड डायग्नोस्टीक सेंटर प्रा. लि. यांनी रिक्त वास्तुचा ताबा ०८ सप्टेंबर २०१५ पर्यंत बृहन्मुंबई महापालिकेकडे न दिल्यास १४ सप्टेंबर २०१५ पासून सदर जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘ई’ विभाग कार्यालयाने जाहीर केले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘ई’ विभागातील मेसर्स बालाजी हार्ट हॉस्पिटल ऍण्ड डायग्नोस्टीक सेंटर प्रा. लि. यांना सीटी सर्व्हे क्र. ५६६ (विभाग) व्हिक्टोरिया रोड, (कमरखानुम) प्रसुतिगृह माझगांव डिव्हीजन, व्हिक्टोरिया चर्चजवळ, भायखळा (पूर्व), मुंबई – ४०० ०२७ ही जागा (सार्वजनिक खाजगी प्रोत्साहन प्रकल्प धोरणातंर्गत) १० वर्षाकरिता प्रसुतिगृह सेवा चालविण्यासाठी दिनांक ०४ ऑगस्ट, २००४ साली देण्यात आली होती. सदर करार ०३ ऑगस्ट, २०१४ साली संपुष्टात आला असून सदर संस्थेस कराराचे नूतनीकरण नाकारण्यात आले आहे. सदरहू संस्थेस सदर जागा रिकामी करण्याकरिता महानगरपालिकेच्या टर्मिनेशन नोटीसद्वारे २४ ऑगस्ट २०१५ रोजी कळविण्यात आले होते. त्यानंतरही संस्थेच्या वैद्यकीय कर्मचारी वृंदातर्फे संदर्भित वैद्यकीय संस्थेमध्ये बाह्यरुग्ण व आंतररुग्णांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येत आहेत. सदर सुविधा ०८ सप्टेंबर २०१५ रोजी खंडीत करण्यात येत असल्यामुळे नागरिकांनी आपली गैरसोय टाळण्याकरिता आपल्या वैद्यकीय उपचारांसाठी पर्यायी व्यवस्था करुन बृहन्मुंबई महानगरपालिकेस सहकार्य करावे,  असे जाहीर करण्यात येत आहे. अद्यापपर्यंतही सदरहू संस्थेने रिक्त वास्तुचा ताबा महापालिकेकडे दिला नसल्याने १४ सप्टेंबर २०१५ पासून सदर जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरु करणार असल्याचे बृहन्मुंबई महापालिकेच्या ‘ई’ विभाग कार्यालयाने जाहीर केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages