मांसबंदीचा वाद यंदाच कसा उफाळला ? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मांसबंदीचा वाद यंदाच कसा उफाळला ?

Share This

 उद्धव ठाकरे यांनी दाखवले भाजकडे बोट
जैन मुनींनी मातोश्रीवर घेतली उद्धव यांची भेट
मुंबई / प्रतिनिधी
पर्युषण पर्व काळातील मांसबंदीवरुन कधीही वाद नाही झाला. मात्र यंदाच तो का उफाळला असा प्रश्न उपस्थित करत िशवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीमधील िमत्रपक्ष भाजपवर आज अप्रत्यक्ष निशाणा साधला तसेच ज्याने त्याने आपला धर्म आपल्या घरात पाळावा अशी सक्त ताकीदही िदली.

रविवारी ज्येष्ठ जैन मुनी आिण उद्योजक यांनी उद्धव यांची मातोश्रीवर भेट घेतली.  मांसबंदीवरुन उद् भवलेल्या वादावर तसेच सेनेने जैनांना िदलेल्या इशाऱ्यांवर चर्चा केली. त्यावेळी उद्धव यांनी, ज्याने त्याने आपला धर्म आपला घरात पाळावा. इतरांवर तो लादण्याचा प्रयत्न करु नये, असे सांगत मांस बंदीचा वाद िशवसेनेसाठी संपला असल्याचे जाहीर केले. तसेच पर्युषण पर्व काळात अशुद्ध िवचार करणे ही सुद्धा एक प्रकारची हिंसा आहे, असा िचमटा त्यांनी जैन मुनींना काढला.
 
इतकी वर्षे मांस बंदी होती. परंतु असा वाद कधीही उभा राहिला नव्हता. मग यंदाच मांसबंदीवरुन रान का उठले ? असा प्रश्न उपस्थित करत भाजपची सत्ता असलेल्या मिरा-भाईंदर महापालिकेनेच आठ िदवस मांसबंदी करुन या वादाला तोंड फोडल्याच्या वस्तुस्थितीकडे उद्धव यांनी बोट दाखवले. तसेच मांसबंदीचा वाद िनर्माण करुन राजकीय प्रदूषण करणाऱ्या मंडळींना खड्यासारखे बाजूला करण्याचे आवाहन मुंबईकरांना करत उद्धव यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही अप्रत्यक्ष टोला लगावला.

भाजपची सत्ता असलेल्या िमरा-भाईंदर महापालिकेने पर्युषण पर्व काळातील आठ दिवस मांसबंदीचा ठराव केला होता. त्यानंतर सेनेची सत्ता असलेल्या बृहन्मुंबई आिण राष्ट्रवादी-काँग्रेसची सत्ता असलेल्या नवी मुंबई महापालिकेनेही चार िदवस मांसबंदीचे िनर्णय घेतले होते. त्याला िशवसेना आिण मनसेने कडाडून विरोध झाला होता. जैन धर्मियांनी खाय खायचे हे आम्हाला िशकवू नये असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट सांगत अत्यंत आक्रमक भूिमका घेतली होती.

सेना, मनसेच्या इशाऱ्यानंतर जैन मुनींनी मुंबई आमची आहे, असे सांंगत शनिवारी एक िदवसाचे उपोषण केले होते. मांसबंदीच्या िनर्णयाला राजकीय स्वरुप आले होते. तसेच प्रश्न िचघळत चालल्याने जैन मुनींनी आज उद्धव यांची भ्ेट घेऊन वादावर तोडगा काढण्यासाठी स्वत: पुढाकार घेतला.


मनसेचे आंदोलन  िशवसेनेने मांसबंदीचा वाद संपवला असला तरी मनसे मागे हटण्यास तयार नाही.  िवलेपार्ले येथील गुजराती सोसायटीसमोर मनसे सैनिकांनी रविवारी नॉनव्हेज पार्टी करुन मांसबंदीबाबतचा आपला रोष जोरदारपणे प्रकट केला.
बिहारात उमेदवार िबहार िवधानसभा िनवडणुकीत िशवसेना उतरणार असल्याचे पक्ष प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी रविवारी स्पष्ट केले. िशवसेना स्वतंत्रपणे िनवडणुका लढवणार की भाजपसोबत युती करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ई टेंडरिंग अडथळाकंत्राटे देण्यास ई टेंडरिंग पद्धतीमुळे िवलंब होत असल्याने पैसा असूनही सार्वजनिक कामे मोठ्या प्रमाणात खाळंबली असल्याची टिका उद्धव यांनी रविवारी बोरिवलीमधील कार्यक्रमात करत युती सरकारला घरचा आहेर िदला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages