म्हाडा अभय योजनेला ६ महिन्यांची मुदतवाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 September 2015

म्हाडा अभय योजनेला ६ महिन्यांची मुदतवाढ

मुंबई : 28 Sep 2015
म्हाडा घरांची उर्वरित रक्कम न भरलेल्या रहिवाशांची व्याजाची रक्कम ही कोट्यवधी रुपयांच्या आसपास असून ही रक्कम वसुलीकरिता राबवण्यात येणार्‍या अभय योजनेचा कालावधी सहा महिन्यांनी वाढवण्यात आला आहे. 

अत्यल्प उत्पन्न गटासाठी या योजनेत लाभ घेणार्‍या रहिवाशांनी घरांची उर्वरित रक्कम न भरल्याने रकमेचे व्याज कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. त्या रकमेच्या वसुलीसाठीच मागील वर्षापासून म्हाडाच्या माध्यमातून अभय योजना सुरू करण्यात आली होती. दिलेल्या कालावधीत रक्कम न भरलेल्या रहिवाशांकडून पूर्ण रकमेची वसुली करण्याचा अंतर्भाव योजनेत होता. १ सप्टेंबर २0१४ ते ३१ मे २0१५ पर्यंत या योजनेचा कलावधी देण्यात आला होता. मुद्दल तसेच थकबाकीवरील व्याजाची रक्कम भरल्यास सवलत देण्याचे म्हाडाकडून जाहीर करण्यात आले होते. म्हाडाच्या विविध मंडळांच्या माध्यामातून दिलेल्या कालावधीत ६0, ४५, ३0 टक्के सूट देण्यात आली आहे. त्यानुसार, सूट देण्याच्या पहिल्या टप्प्यात १ कोटी २४ लाख रुपये, दुसर्‍या टप्प्यात ७२ लाख ८७ हजार रुपये व तिसर्‍या टप्प्यात ४७ लाख ८९ हजार रुपये इतकी रक्कम जमा झाली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS