पनवेल ते दिवा या मार्गावर शटल रेल्वे सेवा 1 ऑक्टोबर पासून सुरू होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 September 2015

पनवेल ते दिवा या मार्गावर शटल रेल्वे सेवा 1 ऑक्टोबर पासून सुरू होणार


खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे, आ. प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश
मुंबई / प्रतिनिधी
खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे, आ. प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने पनवेल ते दिवा या मार्गावर मध्य रेल्वे तर्फे प्रायोगिक तत्त्वावर शटल रेल्वे सेवा सुरु होणार आहे. दि. 01 ऑक्टोबर, 2015 पासून हि शटल रेल्वे सेवा रात्री सुमारे 8.00 वा. दिवा येथून सुरू होईल ती पनवेल ला रात्री 09.00 वा. पोहचेल आणि पनवेलहून रात्री सुमारे 9.10 वा निघून ती दिवा येथे रात्री 10.10 मिनिटांनी पोहचेल.


पनवेल ते दिवा या मार्गावर शटल रेल्वे सेवा सुरु करण्याची नागरिकांची प्रलंबित मागणी होती. या संदर्भात प्रवासी नागरिकांच्या शिष्टमंडळाने खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे, आ. प्रशांत ठाकूर यांच्याकडे सातत्याने सदर मागणी रेटली. खा. पाटील यांनी मध्य रेल्वेचे महाप्रबंधक एस के सुद यांच्याकडे या मागणीचा पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश प्राप्त झाले असून मध्य रेल्वेचे महाप्रबंधक एस के सुद यांनी दि. 28 सप्टेंबर रोजी  पत्र पाठवून सदर मार्गावर शटल रेल्वे सेवा सुरू करण्यात येत असल्याचे कळविले आहे. खा. कपिल पाटील, आ. किसन कथोरे, आ. प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकाराने प्रवासी नागरीकांची प्रलंबित मागणी पुर्णत्वास आली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages