बकरी ईदनिमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बकरी ईदनिमित्त बेस्टच्या जादा बसगाड्या

Share This
मुंबई : 22 Sep 2015
बकरी ईद आणि बासी ईद निमित्त बेस्ट प्रशासनातर्फे जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. या दोन्ही दिवशी शहर आणि उपनगरात बकरी ईदनिमित्त होणारी जास्त गर्दी विचारात घेऊन शुक्रवारी ३0, तर शनिवारी ६0 जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही दिवशी ईदसाठी बाहेर पडणार्‍या नागरिकांना गर्दीच्या वेळेस दिलासा मिळणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी बसमार्ग क्रमांक २५ र्मया, २८, ३३, ८८, १२४, २३१, २४१, ३१३, ३५१, ३५७, ३७५ र्मया, ४0८, ४२२ आणि ५0७ र्मया या बसमार्गांवर ३0 जादा बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. तर बासी ईदनिमित्त शनिवार, २६ सप्टेंबर रोजी बसमार्ग क्रमांक ७ र्मया, ८ र्मया, २८, ३३, ३७, ८८, १२४, १३५ जादा, १८0, २0३, २३१, २४२, २५३, २५६, २७१, ३0९ र्मया, ३३२, ३४१, ३५0, ३५५ र्मया, ३५७, ३७५ र्मया, ३७६, ४0८, ४२२, ५२४ र्मया आणि सी-७२ या बसमार्गांवर एकूण ६0 जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास प्रवाशांच्या सोयीसाठी जादा बसगाड्यादेखील सोडण्यात येणार आहेत.प्रवाशांच्या मदतीसाठी जास्त गर्दी असणार्‍या बसथांब्यावर बसनिरीक्षकाची तसेच वाहतूक अधिकार्‍यांची नेमणुक करण्यात येणार आहे. या जादा बसगाड्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

अनंत चतुर्दशीला गाड्यांमध्ये कपात
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईकर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देणार आहेत. या दिवशी मुंबई शहर अणि उपनगरातील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद असतात. तसेच मोठय़ा प्रमाणावर बसमार्गांचे, वाहतुकीचे परावर्तनदेखील करण्यात येते. याशिवाय या दिवशी बेस्टच्या बसगाड्यांमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्यादेखील कमी असते. त्यामुळे बेस्ट प्रशासनातर्फे या दिवशी बेस्टच्या बसेसमध्ये कपात करण्यात येते. रविवार, २७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजून ३0 मिनिटांनंतर एकूण २९२0 अनुसूचित बसगाड्यांपैकी १४९४ बसगाड्या चालवण्यात येणार आहेत. तसेच या दिवशी वातानुकूलित बसगाड्या पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. याची सर्व बसप्रवाशांनी नोद घ्यावी आणि आपला प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनाने केले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages