आरोपीचे सत्र न्यायालयातून पलायन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आरोपीचे सत्र न्यायालयातून पलायन

Share This
मुंबई : शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातील आरोपीने मंगळवारी दुपारी सत्र न्यायालयातून पलायन केल्याची खळबळजनक घटना घडली. मोहम्मद तौसिफ मोहम्मद हनिफ जैदी (२६) असे पळालेल्या आरोपीचे नाव असून त्याचा शोध कुलाबा पोलीस घेत आहेत. 
आरोपींना न्यायालयात हजर करताना पोलीस बळाची कमतरता, न्यायालयातील गोंधळ याचा फायदा काही आरोपी घेऊन ते न्यायालयातूनच पळ काढण्यात यशस्वी होतात. अशा प्रकारच्या शहरात अनेकदा घटना घडल्या असून शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खुनाच्या प्रयत्न केल्याच्या गुन्ह्याच्या प्रकरणात गोवंडी,बैगणवाडी येथे राहणारा तौसिफला चार महिन्यांपूर्वी शिवाजी नगर पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत असलेल्या तौसिफ याला मंगळवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या दरम्यान सत्र न्यायालयात सुनावणीसाठी नेण्यात आले होते. न्यायालयाच्या दुसर्‍या माळय़ावरील कोर्टात तौसिफची सुनावणी होऊन त्याला दुसरी तारीख न्यायालयाकडून देण्यात आली. त्यानंतर तौसिफला न्यायालयात घेऊन आलेले हत्यारी विभागाचे पोलीस क्लार्कशी चर्चा करीत असताना तौसिफने संधीचा फायदा घेत तेथून पळ काढला. या घटनेचा उलगडा होताच त्याला न्यायालयात घेऊन आलेल्या हत्यारी पोलिसांची तारांबळ उडाली. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. कुलाबा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तौसिफने न्यायालयाच्या परिसरातून कसा पळ काढला, त्या वेळी पोलीस काय करीत होते, याचा तपास करण्यास सुरुवात केली असून याकामी न्यायालयाच्या आवारात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची मदत घेतली जाणार असल्याची माहिती कुलाबा पोलीस ठाण्याचे वपोनि. विजय गाडगिळ यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages