रेल्वेद्वारे क्षयरोग जनजागृती कार्यक्रमाला सुरुवात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रेल्वेद्वारे क्षयरोग जनजागृती कार्यक्रमाला सुरुवात

Share This
मुंबई : 'क्षयरोग नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या विविध नावीण्यपूर्ण प्रयत्नांची दखल केंद्र शासन आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनीदेखील घेतली आहे. त्यानुसार 'टीबी हारेगा, देश जितेंगा' या क्षयरोगविषयक मोहिमेतून क्षयरोग विरोधाचा लढा अधिक व्यापक करून जनसामान्यांमध्ये क्षयरोगासंदर्भात निदान, औषधोपचार आणि नियंत्रण याबाबत जागरुकता निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त पालिका आयुक्त (पश्‍चिम उपनगरे) संजय देशमुख यांनी केले.
'टीबी हारेगा, देश जितेंगा' या उपक्रमाचे संदेशदूत प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन यांची छबी आणि मोहिमेचे निरनिराळे संदेश असलेले फलक, पोस्टर्स मध्य रेल्वेच्या उपनगरी रेल्वे गाडीवर लावण्यात आले आहे. त्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांमध्ये जनजागृती करण्याचा प्रय▪करण्यात येत आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्‍चिम उपनगरे) संजय देशमुख यांच्या हस्ते सोमवारी दुपारी १ वाजून १0 मिनिटांनी ठाणे जलद लोकल रेल्वेला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावर फलाट क्रमांक ६वर जनजागृती संदेशाचा फलक दाखवून ही उपनगरी रेल्वे रवाना करण्यात आली आणि जनजागृती मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने जॉन्सन अँण्ड जॉन्सनअंतर्गत जनसेन फार्मास्युटीकल्स यांच्या सहकार्याने मध्य रेल्वेच्या चार उपनगरी गाड्यांवर डब्याच्या आतमध्ये खिडकीवर भित्तीपत्रके लावली आहेत. तर एका लोकलच्या संपूर्ण बाह्यभागावर क्षयरोगाची लक्षणे आणि त्यावर उपलब्ध उपचार पद्धत याबाबत माहिती प्रदर्शित केली आहे. या कार्यक्रमाप्रसंगी महापालिकेच्या वतीने जनजागृतीपर पथनाट्याचे सादरीकरणही प्रवाशांकरिता करण्यात आले. छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकावर दररोज सुमारे ६ लाखांहून अधिक प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे या मोहिमेतून मोठय़ा प्रमाणावर जनजागृती होईल, असा महापालिकेला विश्‍वास आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages