साहित्य सम्मेलनाप्रमाणेच मराठीच्या उत्कर्षासाठी होणार्‍या कार्यक्रमांना कायम निधी द्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

साहित्य सम्मेलनाप्रमाणेच मराठीच्या उत्कर्षासाठी होणार्‍या कार्यक्रमांना कायम निधी द्या

Share This
मुंबई : येत्या ५ सप्टेंबर रोजी अंदमान-निकोबारला होणार्‍या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी पालिकेच्या वतीने २५ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीने बुधवारी संमत झाला खरा, पण त्यावरून 'मराठीची ढाल' पुढे करून, मनसेचे सुधीर जाधव आणि संदीप देशपांडेंनी शिवसेनेला चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. 

या संमेलनासाठी २५ लाख रुपये देण्याची शिफारस खा. शेवाळे यांनी केली होती म्हणून ती संमत झाली असली तरी अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनासाठी आर्थिक मदत मागितल्यास ती कशी देणार, असा प्रश्न जाधव यांनी केल्यानंतर मराठीच्या उत्कर्षासाठी होणार्‍या प्रत्येक कार्यक्रमांसाठी पालिकेने कायमस्वरूपी निधी द्यावा, अशी सूचना देशपांडे यांनी केली. 'शेवाळे स्वत:च्या खिशाला चाट लागू न देता, कायम पालिकेच्या निधीतून रक्कम देण्यास सांगतात. त्यांनी आपला खासदार निधी वापरावा, असा टोला त्यांनी लगावला. 'शेवाळे हे नगरसेवकही आहेत. त्यांनी या पदाचा राजीनामा दिलेला नाही. त्यांच्याप्रमाणे अन्य नगरसेवकांनीही अशी मागणी करण्याचा हक्क आहे. उद्धव ठाकरे तिकडे जाणार आहेत म्हणून त्यांनी २५ लाख रुपयांची तरतूद केलेली नाही. ते स्थायी समितीचे अध्यक्ष असतानाच ही तरतूद केली होती, असे तृष्णा विश्‍वासराव म्हणाल्या. स्थायी समितीच्या सर्व सदस्यांनाही अंदमान-निकोबार येथे पाहणी दौर्‍यासाठी नेण्याची मागणी विश्‍वासराव यांनी यावेळी केली

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages