महाराष्ट्रातील ५९ टक्के विद्यार्थ्यांकडे रोजगारासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा अभाव - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्रातील ५९ टक्के विद्यार्थ्यांकडे रोजगारासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा अभाव

Share This
मुंबई : महाराष्ट्रातील ५९ टक्के विद्यार्थ्यांकडे रोजगारासाठी आवश्यक असलेल्या कौशल्यांचा अभाव असल्याचे मत बहुसंख्य शिक्षकांनीच व्यक्त केले आहे. एका सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने शिक्षक समुदायाने भारतीय विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेबाबत आपली मते स्पष्ट केली असून नवीन शिक्षण धोरणाच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाच्या शिफारसी पिअरसन व्हॉइस ऑफ टीचर सर्व्हे २0१५ मार्फत करण्यात आल्या आहेत.
या सर्व्हेचे आयोजन संपूर्ण देशभरात जुलै २0१५ मध्ये करण्यात आले. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, जळगाव, कोल्हापूर, लोणावळा, नाशिक, रत्नागिरी इत्यादी ५१ शहरांचा त्यात समावेश होता. या राष्ट्रीय सर्वेक्षणातून दिसून आले की, शिक्षकांच्या मते ५७ टक्के विद्यार्थी सुक्षिक्षित आहेत, परंतु ते रोजगारासाठी तयार नाहीत. सर्वेक्षणाच्या प्रतिसादकांनी वाढीव उद्योग-शिक्षण विभाग एकत्रीकरण, विशेषत: अभ्यासक्रमाच्या पुनर्रचनेबाबत (७५ टक्के) ज्यातून रोजगार क्षमतेला चालना मिळेल. गंमत म्हणजे शिक्षक समुदायाने (४४ टक्के) विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तेवर आधारित उद्योग इंटर्नशिप्स (४८ टक्के) सोबत शिक्षकांसाठीही उद्योग प्रशिक्षणाची गरज व्यक्त केली. शिक्षण यंत्रणेत आयसीटीच्या समावेशासाठी संपूर्ण भारतातील शिक्षकांकडून संस्थांमध्ये संगणक आणि इंटरनेट जोडणीची शिफारस ६६ टक्केंनी केली असून स्मार्ट बोर्ड्सची स्थापना महत्त्वाची असल्याचे मत ६२ टक्के शिक्षकांनी व्यक्त केलेी आहे. तथापि, शिक्षक तंत्रज्ञान प्रस्थापनेच्या जास्त खर्चाबाबत विचार करत असून (३८ टक्के) आणि साधनसुविधा व देखभालीचा अभाव (२३ टक्के) हा शैक्षणिक संस्थांमधील तंत्रज्ञानाच्या अंगीकारातील सर्वांत मोठे आव्हान मानला गेला आहे.

तथापि, या निष्कर्षातील एक चांगली बाजूही दिसून आली. ती म्हणजे शिक्षकांच्या मते (६0 टक्के) भारतीय शिक्षण यंत्रणा सर्वांगीण आणि एकात्मिक शिक्षण देत आहे. मात्र उच्च शिक्षणाच्या पातळीवरील शिक्षकांना (५१ टक्के) शालेय शिक्षकांच्या तुलनेत (७२ टक्के) सध्याच्या यंत्रणेच्या एकात्मिक शिक्षण देण्याच्या क्षमतेबाबत शंका वाटते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages