रक्षाबंधनासाठी जादा बसेस सोडूनही बेस्टचे उत्पन्न कमी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रक्षाबंधनासाठी जादा बसेस सोडूनही बेस्टचे उत्पन्न कमी

Share This

मुंबई : रक्षाबंधनासाठी घराबाहेर पडणार्‍या प्रवाशांच्या सोयीसाठी बेस्टने जादा बसेस सोडल्या. या जादा बसेसमुळे बेस्टला आर्थिक उत्पन्न मिळेल असा अंदाज बेस्ट प्रशासनाचा होता, परंतु प्रत्यक्षात शनिवारी बेस्टला मिळालेले उत्पन्न हे दैनंदिन उत्पन्नापेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रक्षाबंधनाला जास्त गाड्या सोडून बेस्टला कमी उत्पन्न मिलालाले आहे. 
रक्षाबंधना निमित्त होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा विचार करून मुंबई आणि उपनगरातील महत्त्वाच्या मार्गावर बेस्टच्या २६ आगारांमधून २१0 जादा बसेस सोडल्या होत्या. मात्र शनिवारी बेस्टला मिळालेले उत्पन्न हे बेस्टला मिळणार्‍या दैनंदिन उत्पन्नापेक्षाही कमी मिळाले आहे. बेस्टला परिवहन सेवेतून दररोज सुमारे ४ कोटींचे उत्पन्न मिळते. मात्र शनिवारी बेस्टला फक्त ३ कोटी ९१ लाख १९ हजार ७३४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. शनिवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे कार्यालये बंद होती, त्यामुळे जास्त प्रवाशांनी बेस्टच्या बसने प्रवास केला नसल्याची सारवासारव बेस्ट प्रशासनाने केली आहे. मात्र बेस्टच्या तुलनेत रेल्वेने अनेक प्रवाशांनी रेल्वेचा पर्याय स्वीकारला होता. शनिवारी मध्य रेल्वेची तिकीटविक्री तब्बल ४ लाखांनी वाढल्याचे समोर आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages