ओला, उबेरवर बंदी आणा टॅक्सी संघटनांची परिवहन खात्याकडे मागणी - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

ओला, उबेरवर बंदी आणा टॅक्सी संघटनांची परिवहन खात्याकडे मागणी

Share This
मुंबई : ओला आणि उबेर या मोबाइल अँपवर आधारित असलेल्या फ्लीट टॅक्सी सेवांवर मुंबईमध्ये तत्काळ बंदी घालण्यात यावी, अशी मागणी सर्व टॅक्सी संघटनांच्या संयुक्त कृती समितीने परिवहन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव गौतम चॅटर्जी यांना भेटून केली आहे. या संयुक्त कृती समितीमध्ये मुंबई टॅक्सी मेन्स युनियन, मुंबई टॅक्सी असोसिएशन, भारतीय टॅक्सी चालक संघ आणि मुंबई टॅक्सी चालक-मालक सेना यांचा समावेश आहे. 
ओला आणि उबेर या फ्लीट टॅक्सी सेवा मुंबईत केवळ मोबाइल अँपद्वारे चालवल्या जातात. त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नसल्यामुळे त्यांचे भाडे दर हे काळ्या-पिवळ्या टॅक्सीपेक्षा खूपच कमी आहे. परिणामी, काळ्या-पिवळ्या टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर त्याचा थेट परिणाम होत आहे. यामुळे या टॅक्सींवर ताबडतोब बंदी घालण्यात यावी आणि त्यांची वेबसाईटदेखील बंद करण्यात यावी, अशी मागणी या कृ ती समितीने केली आहे. कृती समितीच्या शिष्टमंडळाने परिवहन सचिवांना ओला आणि उबेरवर कारवाई करण्याचे निवेदन दिले आहे. तसेच ओला आणि उबेर या टॅक्सी टुरिस्ट परवानाधारक असूनदेखील त्या किलोमीटरप्रमाणे भाडे आकारत आहेत. अँपबेस टॅक्सीबाबत येत्या महिन्याभरात कायदा तयार करण्यात येणार असून त्यांचे दर मुंबई महानगर वाहतूक प्राधिकरणात ठरवण्यात येतील, असे आश्‍वासन परिवहन सचिवांनी दिले असल्याची माहिती समितीचे निमंत्रक ए. एल. क्वॉड्रोज यांनी दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages