"मुंबईकरांच्या हक्काचा एक पैसाही दंड रुपाने भरलात तर याद राखा'- राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

"मुंबईकरांच्या हक्काचा एक पैसाही दंड रुपाने भरलात तर याद राखा'- राष्ट्रवादीचा आक्रमक पवित्रा

Share This

मुंबई: ३ सप्टेंबर-मुंबईकरांच्या मेहनतीतून कर रुपाने गोळा झालेल्या पैशापैकी एक पैसा जरी दंडापोटी भरला तर आम्ही रस्त्यावर उतरून महापालिका प्रशासनाला जाब विचारू, असा आक्रमक पवित्रा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी घेतला आहे. महापालिका कर्माचाऱ्यांच्या पगारातून आयकर कापूनही तो आयकर विभागाकडे न भरल्यामुळे आयकर विभागाने महापालिकेच्या वित्त विभागाला तब्बल २०० कोटींचा दंड ठोठावला आहे. मात्र दंडाची ही रक्कम महापालिकेच्या तिजोरीतून भरू नये अशी भुमिका राष्ट्रवादी काँग्रेसने घेतली आहे.


या प्रकरणी महापालिका प्रशासनाने केलेला थातूरमातून खुलासा आम्हाला मान्य नाहीशिवाय कर्मचाऱ्यांच्या पगारातून आयकरापोटी ापलेली रक्कम जर महापालिकेच्या वित्त विभागानेगोळा केली होतीतर मग आयकर विभागाकडे भरली का ाहीमग ही रक्कम कुठे वापरलीगेली हा खुलासा होण्याचीही गरज असल्याचे ते म्हणालेतसेच एवढ्या मोठ्या पातळीवर हलगर्जीपणा करणाऱ्या कर्माचाऱ्यांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावीअशी मागणीही त्यांनी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages