मुंबई: १३ सप्टेंबर - मुंबईच्या नालेसफाईतल्या भ्रष्टाचाराच्या चिखलात तुमचेही हात काळे झाले आहेत. या भ्रष्टाचाराला तुम्हीही तितकेच जबाबदार आहात, कारण तुम्हीही मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या बरोबरीने सत्तेत सहभागी झालेले आहात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी भाजपाला लगावला आहे. त्यामुळे नालेसफाईत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यापुर्वी आधी सत्तेतून बाहेर पडा, असा सल्ला देत मा. अहिर यांनी भाजपाच्या दुतोंडी राजकारणावर तोफ डागली आहे.
पावसाळ्यापुर्वी मुंबई महापालिकेतर्फे मुंबईतल्या सर्व नाल्यांची सफाई करण्यात येते. कोट्यवधी रुपयांच्या या नालेसफाईच्या कंत्राटात मोठा भ्रष्टाचार होत असून काही दिवसांपुर्वी महापालिका आयुक्तांनी केलेल्या चौकशीद्वारे सत्ताधाऱ्यांचे पितळ उघडे पडले. या भ्रष्टाचाराची आपल्या मागणीमुळे चौकशी झाली असून आपल्या या भ्रष्टाचाराशी काहीही संबंध नसल्याचा दावा करत भाजप करू पाहत आहे. मात्र असा दावा करून भाजप जरी नामानिराळा राहू पाहत असला तरी महापालिकेतील सत्तेत भाजपही सहभागी असल्याने या भ्रष्टाचाराला शिवसेनेसोबत भाजपही तितकाच जबाबदार असल्याचे अहिर म्हणाले. नालेसफाईतल्या भ्रष्टाचाराचे खापर शिवसेनेवर फोडून आपला या भ्रष्टाचाराशी काहीही संबंध नसल्याचा भाजपचा दावा म्हणजे मुंबईकरांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार असल्याचेही अहिर यावेळी म्हणाले.
खरोखरच जर भाजपला या भ्रष्टाचारात कारवाई करण्याची इच्छा असेल, तर राज्य सरकार त्यांचेच आहे. आपल्या पक्षाच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून नालेसफाईतल्या भ्रष्टाचाराला जबाबदार असलेल्या सरकारी अधिकारी, राजकीय नेते आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई करा. मात्र त्या आधी महापालिकेच्या सत्तेतून बाहेर पडा, कारण एकीकडे सत्तेचे लाभ उचलायचा, भ्रष्टाचारातून आलेल्या टक्केवारीचे लोणी आपल्याही पोळीवर अोढून घ्यायचे आणि दुसरीकडे मात्र आपण भ्रष्टाचाराच्या विरोधात असल्याचे दाखवायचे हे दुतोंडी राजकारण आता बंद करा, असा सज्जड इशाराही अहिर यांनी भाजपला दिला आहे