सनातन संस्था काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाप - पत्रकार निखील वागळे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 September 2015

सनातन संस्था काँग्रेस-राष्ट्रवादीचे पाप - पत्रकार निखील वागळे

मुंबई / 21 Sep 2015 / प्रतिनिधी - काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने राज्यघटनेशी इमान राखत धर्मनिरपेक्षपणे राज्याचा कारभार हाकला नाही. गांधी, नेहरु यांचा वापर त्यांनी वारसा सांगण्यापुरता केला. गांधी, नेहरुंवर काँग्रेसवाल्यांची खरोखरच श्रद्धा असती तर सनातन सारख्या िवषारी प्रचार करणाऱ्या संस्थेच्या वेळीच मुसक्या आवळल्या असत्या असे सांगत सनातन संस्था फोफावण्यास काँग्रेस, राष्ट्रवादी जबाबदार आहे, असा गंभीर आरोप ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांनी केला. 

पद्मश्री दया पवार प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी मुंबईतील माहीमच्या कर्नाटक संघात २०१५ सालचे दया पवार स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी वागळे बोलत होते. दया पवार पुरास्कारचे यंदाचे १९ वे वर्ष असून पाच हजार रुपये रोख, शाल आिण स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते.


सनातन संस्था १९९० मध्ये स्थापन झाली. गोवा, ठाणे, नवी मुंबई, पुणे, मालेगाव येथील बाँबस्फोटात या संस्थेचा हात होता. परंतु काँँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने कठोर कारवाई करण्याचे टाळले. त्यावेळी पोिलसांनी व्यावसाियक कर्तव्य बजावले असते. सनातनच्या आश्रमावर छापे टाकले असते तर मोहसीन शेख, डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे यांचे बळी गेले नसते असा दावा त्यांनी केला. तसेच सनातन संस्थेला काँग्रेस, राष्ट्रवादी, िशवसेना आिण भाजप अशा सर्वपक्षीय नेत्यांकडून आर्थिक मदत होत आहे, असा आरोपही वागळे यांनी आपल्या भाषणात केला.

देशभर आज हिंदुत्वाचा रावण उभा राहिला आहे. त्याला तोंड देण्याची धमक कुणाच्यातही नाही. एकीकडे िनतीश- लालू आहेत तर दुसरीकडे काँग्रेस आहे. या दोघांनीही िवश्वास गमावलेला आहे. त्यामुळे कवी, लेखक, पत्रकारांना वैयक्तीक आिण सामािजक अशा दोन्ही पातळ्यांवर िनकराची लढाई करावी लागणार आहे, असाइशारा वागळे यांनी िदला.

महाराष्ट्र टाईम्सच्या पत्रकार प्रतिमा जोशी आिण कादंबरीकार, कवी भीमसेन देठे यांना पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्काराने गौरवण्यात आले.धमक्या येण्याच्या काळात लेखक, कवींनी दणकून बोललं पाहिजे, असे आवाहन करत अतिरेकी संघटनाविरुद्धची लढाई एकट्यादुकट्याची नाही तर संपूर्ण समाजाची असल्याचे सत्काराला उत्तर देताना प्रतिमा जोशी म्हणाल्या. 

रंगवेधच्या िवद्यार्थ्यांनी यावेळी दया पवार यांच्या िनवडक कविता सादर केल्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी सतीश काळसेकर होते. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा हिरा पवार यांनी प्रास्ताविक केले. दया पवार यांच्या गाजलेल्या ह्यबलुतंह्ण या कादंबरिचा इंग्रजीत अनुवाद करणाऱ्या िजरो पिंटो यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. वैभव छाया यानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

पोलीस भीती घालतातज्या पोलीसांनी संरक्षण करायचे, तेच पोलीस लेखक, कवी, पत्रकार यांना जरा सांभाळून राहा, असा इशारा देत आहेत, असे सांगून पोलीस माझे संरक्षण करु शकत नाहीत, अशी खात्री झाल्याने आपण संरक्षण नाकारल्याचे वागळे यांनी सांगतिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages