आर.के.सिंह सारख्या लोकांमुळे सनातनवर बंदी येऊ शकली नाही - नवाब मलिक यांचा आरोप - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आर.के.सिंह सारख्या लोकांमुळे सनातनवर बंदी येऊ शकली नाही - नवाब मलिक यांचा आरोप

Share This
मुंबई – दि.21 - सनातन ही आंतकवादी संघटना असून त्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव आघाडी सरकारने केंद्राकडे पाठवला होता. पण त्यावेळी केंद्रात गृहसचिव म्हणून काम करणाऱ्या भाजपा विचारसरणीच्या आर.के.सिंह सारख्या लोकांमुळेच सनातन संघटनेवर बंदी येऊ शकली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

सनातन संघटनेचा आंतकवादी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे धागेदोरे हाती लागल्यानंतर 2011 साली आघाडी सरकारने सनातन संघटनेवरील बंदी संदर्भातील शिफारस केंद्राकडे केली होती.पण तत्कालीन गृहसचिव म्हणून काम पाहणाऱ्या आर.के.सिंह सारख्या लोकांनी याबाबत टाळाटाळ करण्याचे धोरण घेतले.त्यामुळेच सनातन संघटनेवर बंदी येऊ शकली नाही. सध्या गोंविदराव पानसरे यांच्या हत्याप्रकरणात सनातन संघटनेच्या सहभाग असून तात्काळ सनातन संघटनेवर बंदी घातली जावी अशी मागणी मलिक यांनी केली आहे

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages