झोपडपट्टी पुनर्विकासात पार्किंग बंधनकारक ? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

झोपडपट्टी पुनर्विकासात पार्किंग बंधनकारक ?

Share This
मुंबई - 4 Sep 2015
झोपडपट्टी पुनर्विकासामध्ये लोकसंख्या आणि वाहने यांचा समतोल साधण्यासाठी प्रकल्प आराखड्यातच पार्किंग बंधनकारक करण्याबाबत विचार सुरू असल्याचे सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 
मुंबईत अनेक ठिकाणी पालिकेच्या, म्हाडाच्या जागेवर झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या आहेत. त्यापैकी म्हाडाच्या जमिनीवरील या अतिक्रमित झोपडपट्टय़ा एसआरएच्या मार्गदर्शक प्रणालीनुसार पुनर्विकास करण्यासाठी हालचाली सुरू आहेत; परंतु मुंबई महापालिकेच्या जागेवर सर्वात जुन्या झोपडपट्टय़ा आहेत. त्यांच्यावर पुनर्विकास करताना जागेचे क्षेत्रफळ आणि रहिवाशांची संख्या याचा मेळ साधताना विकासकांना तारेवरची कसरत करावी लागते. परिणामी, पार्किंग नसल्यामुळे एसआरए इमारतींच्या बाहेर वाहनांची गर्दी दिसून येते. आता वाहनतळही बंधनकारक केल्यानंतर इमारतींची उंची वाढवणे आवश्यक ठरणार असल्याचे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणातील सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

एसआरएसाठी इमारती उभारताना ७ ते ११ मजल्यांच्या इमारतींना परवानगी देण्यात येते. मात्र रहिवाशांची संख्या आणि घरानुसार पार्किंगची जागा उपलब्ध करण्यासाठी विकासकांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. एसआरए इमारतींच्या विकास नियंत्रण नियमावलीमध्ये हा बदल करण्याबाबत प्राधिकरणाकडे चर्चा सुरू असून ७ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या सभागृहात मागणी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages