केईएममध्ये महिला सुरक्षारक्षकाचा विनयभंग - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

केईएममध्ये महिला सुरक्षारक्षकाचा विनयभंग

Share This
मुंबई : केईएम रुग्णालयातील महिला सुरक्षारक्षकाचा विनयभंग करणार्‍या सुरक्षारक्षकाविरोधात भोईवाडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. केईएम रुग्णालयात सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा संदीप पाटील हा या रुग्णालयाच्या महिला सुरक्षारक्षकांना येता-जाता शेरेबाजी करून त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करत होता. पाटील याच्या अशा वागण्याबाबत त्याच्याविरोधात येथील महिला सुरक्षारक्षकांच्या तक्रारी होत्या. अशातच पाटील याने २५ वर्षीय महिला सुरक्षारक्षकाला कामानिमित्त केबिनमध्ये बोलावून घेऊन तिचा हात पकडला व लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याची तक्रार पीडित महिला सुरक्षारक्षकाने केली. त्यानंतर तिला याबाबत पोलिसांत तक्रार करण्याबाबत सांगण्यात आले. त्यानुसार, या प्रकरणी भोईवाडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages