दाभोळकर, पानसरे हत्येचा छडा लावून चार आठवड्यांत अहवाल सादर करा - उच्च न्यायालय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दाभोळकर, पानसरे हत्येचा छडा लावून चार आठवड्यांत अहवाल सादर करा - उच्च न्यायालय

Share This
मुंबई : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येचा छडा लावण्यास अपयशी ठरलेल्या राज्य सरकार आणि सीबीआयच्या तपास कामावर उच्च न्यायालयाने तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. तपास अधिकार्‍यांमध्येच समन्वय नसेल तर तपास कसा होणार? असा सवाल उपस्थित करून न्यायालयाने या हत्यांकडे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहू नका. तर हत्यांचा छडा लावून चार आठवड्यांत प्रगत अहवाल सादर करा, असे निर्देश तपास यंत्रणांना दिले.
डॉ. दाभोळकरांच्या मारेकर्‍यांना अटक करण्यास अपयश आल्याने दाभोळकर यांची कन्या मुक्ता दाभोळकर आणि पुत्र हमीद दाभोळकर यांनी तर पानसरे यांची कन्या स्मिता आणि सून मेघा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. त्या याचिकांवर न्या. रणजीत मोरे आणि न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठासोर बुधवारी सुनावणी झाली. या वेळी दोन्ही तपास यंत्रणांनी न्यायालयात तपास अहवाल सादर केला. मात्र, न्यायालयाने हा अहवाल पाहिल्यानंतर नाराजी व्यक्त केली. या हत्यांकडे केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न म्हणून पाहू नका; अन्यथा चुकीचा संदेश जाईल. असे खडे बोल सुनावताना दोन्ही हत्यांमध्ये साधम्र्य आहे. मात्र, तपासात कोणतीच प्रगती दिसून येत नाही, असे मत व्यक्त केले. तसेच तपास करणार्‍या पथकातील जागा रिक्त राहू देऊ नका. अन्य अधिकार्‍यांची तातडीने नियुक्ती करा, असेही खंडपीठाने बजावून चार आठवड्यांत प्रगत अहवाल सादर करा, असा आदेशच दोन्ही तपास यंत्रणांना दिला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages