समीर गायकवाडबाबत सनातनची सावध भूमिका घेण्यास सुरुवात - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

समीर गायकवाडबाबत सनातनची सावध भूमिका घेण्यास सुरुवात

Share This
कोल्हापूर : 24 Sep 2015
कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात समीर गायकवाडच्या सहभागचे पुरावे मिळत असल्याचे पोलीस गोटातून सांगितले जात असल्याने सनातनने सावध भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे. समीर गायकवाड सनातन संस्थेचा पूर्णवेळ कार्यकर्ता नाही. तो निर्दोष आहे असे आम्हाला वाटते म्हणून आम्ही त्याचा खुनात सहभाग नसल्याचे म्हटले आहे. त्याला आम्ही क्लीन चिट दिलेली नाही. कायदा काय ते ठरवेल, असे शुक्रवारी सनातनच्या वकिलांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले. अटक झाल्यापासून समीरच्या पाठीशी असलेल्या सनातनने आता घेतलेल्या या फारकतीबाबत विविध तर्कवितर्क व्यक्त होत आहेत.
कॉ. पानसरेंच्या हत्या प्रकरणात प्रमुख संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी समीर गायकवाड याला अटक केली आहे. तो सनातन या संस्थेशी निगडित असल्याने प्रचंड खळबळ उडली आहे. सनातनने देखील तो आमचाच असून निर्दोष असल्याचे अटक झाल्यानंतर लगेच सांगितले. शुक्रवारी मात्र सनातनच्या वकिलांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन बाजू मांडली. या पत्रकार परिषदेत त्यांनी समीरपासून फारकत घेतल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला. समीरसह इतर आरोपींना सनातन संस्थेने निर्दोषत्वाचे सर्टीफिकेट दिलेले नाही. केवळ आम्हाला वैयक्तिकरीत्या ते निर्दोष वाटतात, म्हणून आम्ही लढत आहोत. ते सनातन संस्थेचे पूर्णवेळ कार्यकर्ते नाहीत.

सनातनचे लाखो साधक आहेत. प्रत्येकाच्या कृतीला संस्था कशी जबाबादार असेल, असा सवालही त्यांनी केला. सनातन संस्थेचा पानसरे हत्येशी काहीही संबंध नाही असे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले. दरम्यान, कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणात प्रमुख संशयित आरोपी समीरसह त्याची मैत्रीण ज्योती कांबळे हिलाही अटक करण्यात आलेली आहे. या दोघांच्या मोबाईलवरील संभाषणातून पानसरेंच्या हत्येचा उलगडा झाला असल्याचे पोलीस सांगत आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages