मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेना भाजपा पुन्हा आमने सामने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 September 2015

मुंबई महापालिकेत सत्ताधारी शिवसेना भाजपा पुन्हा आमने सामने

मुंबई / अजेयकुमार जाधव / 24 Sep 2015
मुंबई महानगरपालिकेत सत्तेत मांडिला मांडी लावून बसलेले भाजपा आणि शिवसेनेमधे गेल्या काही महिन्यापासून आपसात सामना रंगला आहे. मांसविक्री नंतर आता शिक्षण अधिकारी यांच्या कारवाई वरून भाजपा आणि शिवसेना आमने सामने आले आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या शिक्षण अधिकारी शांभवी जोगी यांच्यावर 4 वेग वेगळ्या प्रकरणात चौकशी करण्यात आली. या प्रकरणात जोगी दोषी आढळल्या आहेत. लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी यांच्याकडे जोगी दुर्लक्ष करतात. त्यांच्यामधे नेतृत्व गुणांचा अभाव आहे. शालेय वस्तू उशिरा मिळत आहेत यामुले जोगी याना नोकरीवरुन काढून टाकावे असा प्रस्ताव शिक्षण समितीमधे सादर करण्यात आला होता.

याबाबत समिती बैठकीत चर्चा करताना सत्ताधारी भाजपा जोगी याना हटवन्यासाठी आणि शिवसेना जोगी याना हटवू नए म्हणून आमने सामने आली होती. जोगी याना हटवन्यात येवू नए म्हणून भाजपाला एकटे पाडून शिवसेना, कोंग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, सपा एकत्र आले होते. या प्रस्तावावर सभा चलवान्याच्या पद्धतीला बगल देण्यात आली होती. सभा सुरु असताना पक्षाच्या नेत्यांकडून आलेल्या फोन वरून सभे मधे शिवसेना आणि भाजपाचे सदस्य भूमिका घेत होते. यावेळी झालेल्या गोंधालावेळी मतदान घेतले असता जोगी याना नोकरी वरुन काढू नए या बाजूने शिवसेना आणि विरोधी पक्षानी मतदान केले. यामुले भाजपा एकाएकी पडून जोगी यांची नोकरी वाचली आहे

दरम्यान शिक्षण समिती मधे घडलेल्या प्रकारानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत एका रात्रीत असे काय घडले. नालेसफाई मधील दोषी अधिकार्याना  शिवसेना वाचवायला पुढे आली होती. आता जोगी याना शिवसेना वाचवू पाहत आहे. शिवसेना आणि बाकि विरोधी पक्ष आधी याच जोगी यांच्या विरोधात बोलत होते. आता यांचे मत परिवर्तन झाले की शालेय वस्तुंच्या कंत्राटदाराने याना एकत्र आणले असे प्रश्न भाजपा गटनेते मनोज कोटक यांनी उपस्थित केले आहेत.

तर जोगी यांनी चेक घोटाला झाला असताना खाते बंद केले. पालिकेचे पैसे वाचवले. त्यांच्या पदोन्नती वेळी आयुक्तानी चांगले शेरे लिहिले आहेत. शालेय वस्तूंचे टेंडर उशिरा काढले मग वस्तू उशिराच मिळणार. याला इतर अधिकारी पण जबाबदार असताना एकटया जोगी याना दोषी धरणे योग्य नाही. असे सभागृह नेत्या शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव यांनी सांगितले. भाजपाच्या लोकांची कामे जोगी यांनी केली नसावीत म्हणून जोगी यांच्या मागे भाजपा लागली असावी असा आरोप तृष्णा विश्वासराव यांनी केला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages