तपासणीत अग्निशमन यंत्रणेचे नियम धाब्यावर - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तपासणीत अग्निशमन यंत्रणेचे नियम धाब्यावर

Share This

मुंबई  :  कुर्ला-अंधेरी लिंकरोडवरील प्रमुख प्लाझा व मालाड पश्चिम येथील पाम स्प्रिंग या इमारतींना लागलेल्या आगीनंतर अग्निशमन यंत्रणेच्या तपासणीत या दोन्ही इमारतींमध्ये असलेली अग्निशमन यंत्रणा कामच करीत नसल्याचे उघ़ड झाले आहे. नियम, अटींची अमलबजावणी न करणाऱ्या या दोन्ही इमारतींना पालिकेने नोटिसा पाठवल्या आहेत. नियमांची अमलबजावणी न करणाऱ्या या इमारतींच्या मालकांनी येत्या २४ तांसात याबाबत आपली बाजू मांडावी असे नोटिशीद्वारे कळवले आहे. 

रविवारी कुर्ला-अंधेरी मार्गावरील चकाला येथील प्रमुख प्लाझा व दुसऱ्या दिवशी सोमवारी मालाड वेस्ट येथील क्रोमा शोरुम जवळ असलेल्या पाम स्प्रिंग या आठ मजली इमारतीला आग लागली. आगीत प्लाझा या तीन मजली इमारतीतील दोघे जखमी झाले. तर पाम स्प्रिंग या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर लागलेल्या आगीत घरांचे दरवाजे, खिडक्या जळाल्या. आग नियंत्रणात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आग कशी लागली याची पाहणी केली असता दोन्हीही इमारतीत अग्निशमन यंत्रणेचे नियम, अटी धाब्यावर बसवण्यात आल्याचे आढळले. इमारतीत अग्निशमन यंत्रणा काम करीत नसताना संबंधितांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. २४ तासांत आपली बाजू मांडून समाधानकारक उत्तर दिले नाही, तर नियमानुसार कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages