कोल्हापूर : गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्र, कर्नाटक व गोव्यातील पोलीस ज्या खून प्रकरणाचा दिवस-रात्र तपास करत होते त्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉ. गोविंद पानसरे यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी सनातन संस्थेच्या साधकाला बुधवारी अटक केली. समीर विष्णू गायकवाड (३२, रा. मोती चौक, शनी मंदिर परिसर, सांगली) असे त्याचे नाव आहे. तर पुणे, गोवा व मुंबई येथून तिघांना रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. या सर्वांविरुद्ध भक्कम पुरावे मिळाल्याने त्यांना अटक केल्याची माहिती एसआयटी प्रमुख संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मूळचा सांगलीचा रहिवासी असलेला समीर गायकवाड मोबाइल विक्री व दुरुस्तीचे काम करतो. १९९८ पासून तो सनातन संस्थेसाठी काम करत आहे. त्याची पत्नी सध्या गोव्यात सनातनची साधक म्हणून काम करते. कॉ. पानसरे यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी जे कॉल डिटेक्ट तपासले त्यामध्ये समीरचा क्रमांक मिळाला. त्यानुसार, पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. साध्या वेशातील पोलीस सहा महिने त्याच्यावर लक्ष ठेवून होते. या खून प्रकरणात समीरचा हात असल्याची खात्री झाल्यानंतरच पोलिसांनी त्याला अटक केली, असे संजय कुमार यांनी सांगितले.
मुंबई येथील धर्मरथाचे काम समीर गायकवाड याच्याकडे होते. त्यामुळे तो पंधरा ते वीस दिवस मुंबईत होता. नवी मुंबईतही त्याचे निवासस्थान आहे. त्याचे वडील सांगली आकाशवाणी येथे कर्मचारी होते. सात वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. लहान भाऊ खाजगी नोकरी करतो.
कॉ. गोविंद पानसरे यांचे विचार समीरला पटत नव्हते. त्यामुळे तो चिडलेला होता. समीरचा दुसरा साथीदार शोधण्यासाठी पोलिसांची तीन पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले. १६ फेब्रुवारी कॉ. पानसरेंवर गोळीबार झाला. त्या दिवसांपासून पंधरा दिवसांच्या काळातील मोबाइल डिटेल्स पोलिसांनी तपासले. लाखो कॉल्स पाहिल्यानंतर समीरचा मोबाइल नंबर मिळाला. तो सनातन संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे पोलिसांना समजल्यानंतर साध्या वेषातील पोलिसांचे एक पथक त्याच्या मागावर होते. संशयित आरोपीबाबत जे पुरावे मिळाले होते ते समीरच्या बाबतीत तंतोतंत जुळत असल्याचे लक्षात आल्यानंतर कोल्हापूर, सांगली पोलिसांच्या पथकाने मंगळवारी रात्री १0 वाजता सांगली येथे त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याला पकडले. बुधवारी रात्रभर समीर याच्याकडे चौकशी केली. त्यानंतर त्याला पहाटे साडेचार वाजता अटक केली. त्याच्या सांगली येथील घरावर छापा टाकून काही महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
समीर गायकवाड याला संशयित म्हणून अटक केली आहे. त्याचा खुनात सहभाग होता का किंवा तो खून प्रकरणाचा सूत्रधार आहे, का त्यानेच कट रचला, याची सर्व माहिती घेण्याचे काम सुरू आहे. या खून प्रकरणातील संशयित आरोपीचे पुरावे जुळत असल्यामुळे त्याला अटक केली आहे. समीरला न्यायालयात हजर केले असता, त्याला २३ सप्टेंबर २0१५ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या दरम्यान त्याच्याकडून इतर माहिती घेतली जाणार असल्याचे 'एसआयटी'प्रमुख संजय कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. या वेळी विशेष पोलीस महानिरीक्षक संजयकुमार वर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांच्यासह तपास पथकातील अधिकारी हजर होते.
कुटुंब सनातनशी निगडितगायकवाड कुटुंब सनातन संस्थेशी निगडित आहे. समीर गायकवाड हा गेल्या दहा वर्षांपासून सनातनचा साधक आहे. त्याची पत्नीही सनातन संस्थेचे काम करते. तर समीरच्या दोन्ही मावशीही सनातन संस्थेच्या साधक म्हणून काम करतात.
समीरची खुनशी वृत्तीसमीर हा सुरुवातीला आजोळी संगमेश्वर (बेळगाव) येथे इलेक्ट्रिकचे काम करत होता. सांगलीतील जवाहर चौकात त्याने २0१0 मध्ये मोबाइल शॉपीचे दुकान सुरू केले होते. त्या दुकानात सातत्याने ग्राहकांबरोबर त्याचा वाद होत होता. अनेकदा हाणामारीचे प्रसंगही घडले आहेत. समीरचा स्वभाव खुनशी होता. मरणालाही न घाबरता जगावे, असे तो सतत बोलत असे.
वकीलपत्र घेण्यास नकारकॉ. गोविंद पानसरे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने कोल्हापूर जिल्ह्यात पोकळी निर्माण झाली. अशा थोर नेत्याचा खून करणार्या आरोपीचे वकीलपत्र घेण्यास जिल्हा बार असोसिएशनने नकार दिला आहे. त्यामुळे संशयित आरोपी समीर गायकवाडला वकील मिळाला नाही.

खुनाशी संबंध नाही - समीर गायकवाडकॉ. गोविंद पानसरे यांच्या खुनाशी आपला काहीच संबंध नाही. गेला दीड महिना मी सांगली अथवा कोल्हापुरात आलो नव्हतो. मी माझ्या कामात व्यस्त होतो; परंतु पोलिसांनी चुकीच्या माहितीच्या आधारे मला पकडले आहे, असे संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड याने न्यायालयात सांगून आपल्यावरील आरोप फेटाळले.सनातन संस्थेचा प्रमुख कार्यकर्ता असणारा समीर विष्णू गायकवाड यास पोलीसांनी सांगली येथून अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीसांनी पुणे, मुंबई आणि गोवा येथे तीन पथके पाठवली होती. या पथकांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. मुंबई येथून ज्योती नावाच्या महिलेस ताब्यात घेलते आहे. हे तिघेही सनातन संस्थेचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे कॉ.गोविंद पानसरे यांचा खून सनातन संघटनेच्या साधकांनी केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे.
समीर गायकवाड हा निष्पाप आणि निर्दोष
|
| मुंबई : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेला समीर गायकवाड हा सनातनचा पूर्णवेळ साधक असून, तो निष्पाप आणि निर्दोष आहे. सनातनद्वेष्ट्यांच्या दबावाखाली पोलिसांनी गायकवाड याला हेतुपूर्वक अटक केल्याचा दावा सनातन संस्थेने केला आहे. सनातनला यापूर्वीही अनेकदा झोडपण्यात आले आहे. डॉ. दाभोळकर हत्याप्रकरणीही सनातनच्या अनेक साधकांची चौकशी करण्यात आली. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न झाले नसल्याचे सनातन संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त वीरेंद्र मराठे यांनी स्पष्ट केले आहे. समीर गायकवाड यास केवळ संशयावरून अटक करण्यात आली आहे. पोलीसही तो संशयित असल्याचेच म्हणत आहेत. समीर हा निष्पाप असून त्याला पोलिसांनी यात अकारण गोवले आहे. एखाद्याला चौकशी किंवा पडताळणी केल्यानंतर त्याला पुढील २४ तासांत न्यायालयात हजर करायचे असते. त्यासाठी पोलिसांना काही तास बसून रिमांड कागदपत्रे बनवावी लागतात. मात्र, समीरला पहाटे अटक करून लगेच पोलिसांनी न्यायालयात हजर केले. याचाच अर्थ कागदपत्रे आधीच बनवण्यात आली होती. त्यामुळे हा संपूर्ण बनाव असल्याचे स्पष्ट होते. अटक केल्यानंतर संबंधिताच्या कुटुंबीयांना त्याची कल्पना द्यायची असते. मात्र, पोलिसांनी अटक केल्यानंतर काही तासांनी कुटुंबीयांना त्याची माहिती दिली. हे गंभीर आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याचे सनातनने आपल्या खुलाशात स्पष्ट केले आहे. |