तरुणीवर अत्याचार करणार्‍या तांत्रिकाला अटक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

तरुणीवर अत्याचार करणार्‍या तांत्रिकाला अटक

Share This
मुंबई : सांधेदुखीने बेजार झालेल्यावर उपचारासाठी घरी येणार्‍या तांत्रिकाने २५ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घाटकोपर येथे घडली आहे. घाटकोपर पोलिसांनी आरोपी तांत्रिकाला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
अनेक डॉक्टरांकडे उपचार करूनदेखील सांधेदुखीच्या त्रासातून आराम पडत नसलेल्या इसमाला एकाने तांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार एका तांत्रिकाशी आजाराबाबत चर्चा केल्यानंतर तांत्रिकाने आजार बरा करण्याची ग्वाही दिली. त्यानुसार तांत्रिक दररोज घरी येऊन आजारी इसमावर तंत्र मंत्र करू लागला. आजारी इसमाच्या गळय़ात तांत्रिकाने एक ताईत बांधला व दररोज तो त्यांच्यावर तंत्रमंत्र करू लागला. दरम्यान, आजारी इसमाची घरात असलेली २५ वर्षीय मुलीवर तांत्रिकाची वाईट नजर फिरली होती. तो संधीची वाट पाहत होता. बुधवारी त्याने जाणीवपूर्वक मुलीच्या पित्याला गळय़ातील ताईत लांब जाऊन जाळण्यास सांगितले. दरम्यानच्या काळात घरात एकटी असलेल्या मुलीच्या तोंडावर पाउडर टाकून तांत्रिकाने तिला बेशुद्ध केले व त्यानंतर तिच्यावर अत्याचार करून तेथून पलायन केले. मुलगी शुद्धीवर आल्यानंतर आपल्यावर अत्याचार झाल्याचे तिला समजले. तिने पित्यासह घाटकोपर पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी तक्रार दाखल केली. घाटकोपर पोलीस ठाण्याचे वपोनि व्यंकट पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवून तांत्रिकाला अत्याचार केल्याप्रकरणात अटक केली. अधिक तपासात तो एका मशिदीत साफसफाईचे काम करत असून तो तांत्रिक म्हणून लोकांची फसवणूक करत होता. घाटकोपर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages