मोडकसागर, तानसाच्या पाणलोट क्षेत्राचा विकास होणार - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोडकसागर, तानसाच्या पाणलोट क्षेत्राचा विकास होणार

Share This
मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या मोडकसागर आणि तानसा धरणांच्या पाणलोट क्षेत्राचा विकास करण्यासाठी महापालिका पाच कोटी ६३ लाख रुपये खर्च करणार आहे.

हे काम करताना स्थानिकांना रोजगार मिळणार आहे. राज्य सरकारच्या संवर्धन योजनेअंतर्गत हे विकासकाम करण्यात येणार आहे. या कामाच्या एकूण खर्चापैकी ६0 ते ९0 टक्के निधी राज्य शासन देणार असले तरी हा ६0 ते ९0 टक्के निधी मिळेपर्यंत पालिकेला स्वखर्च करावा लागेल. तानसा आणि मोडकसागर या धरणांचे पाणलोट क्षेत्र अनुक्रमे ९५१९.२४ आणि ३९१२. ५४ हेक्टर एवढे आहे. पाणलोट क्षेत्राचा विकास करताना तेथे हरितकरण, जनावरांचे चरणे, झाडांची बेकायदा कत्तल करणे, आगींपासून पाणलोट क्षेत्राचे संरक्षण करणे, बी पेरणी करणे, फुलझाडांची वाढ करणे, जंगलातील अवैध उत्पादन रोखणे, स्थानिकांना रोजगार देणे, परिसरातील गावांचे पर्यावरण जपणे आदी कामे करण्यात येतील.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages