बलार्ड इस्‍टेट स्ट्रिट फेस्टिवलसाठी मुंबई पोर्ट ट्रस्‍ट सरसावली - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बलार्ड इस्‍टेट स्ट्रिट फेस्टिवलसाठी मुंबई पोर्ट ट्रस्‍ट सरसावली

Share This
मुंबई, दि. 7
मुंबईत येणाऱया परदेशी पर्यटक आणि अन्‍य पर्यटकांना तसेच मुंबईकरांना सुट्टीच्‍या दिवशी पर्वणी ठरावा असा एक बलार्ड इस्‍टेट स्ट्रिट फेस्टिवल सुरू करण्‍यासाठी मुंबई पोर्ट ट्रस्‍ट सरसावली असून आज याबाबतचे सादरीकरण महापालिका आयुक्‍त अजोय मेहता यांच्‍याकडे करण्‍यात आले. मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍या पुढाकाराने हे सादरीकरण आज करण्‍यात आले.


मुंबईत येणारे परदेशी पर्यटक दक्षिण मुंबईत वास्‍तव्‍यास असतात. तर राज्‍यातील पर्यटकही मोठया संख्‍येने मुंबईत आले की गिरगाव चौपाटी, क्विन नेक्‍लेस आणि गेट वे ऑफ इंडिया परिसरात फिरतात. अशा पर्यटकांसाठी सुट्टीच्‍या दिवशी खास फेस्टिवल सुरू करण्‍याची संकल्‍पना मुंबई पोर्ट ट्रस्‍टने मांडली आहे. शुक्रवार ते रविवार या काळात बॅलार्ड इस्‍टेट या परिसरात हा फेस्‍टीवल करण्‍याचा बीपीटीचा मानस आहे. यामध्‍ये विविध कलाकुसरीच्‍या वस्‍तूंसह पर्यटकांना हवा असणाऱया अनेक वस्‍तुंचे स्‍टॉल उपलब्‍ध करून देण्‍यात येणार आहेत. तसेच मुंबई आणि महाराष्‍ट्राची संस्‍कृतीचे दर्शन घडविणाऱया विविध कला यांचेही सादरीकरण करण्‍याचा या फेस्टिवलमध्‍ये नियोजित आहे. बलार्ड इस्‍टेट परिसरात सुट्टीच्‍या दिवशी मोकळया असणाऱया जागेचा वापर करून मुंबईकरांना या फेस्टिवलाचा आनंद लुटता यावा अशी ही संकल्‍पना आहे. मात्र हा फेस्‍टीवल असून ही नाईट लाईफची संकल्‍पना नाही असेही आमदार अॅड आशिष शेलार यांनी सांगितले.


या फेस्टिवलसाठी उभारण्‍यात येणारे स्‍टॉल तात्‍पुरत्‍या स्‍वरूपाचे असून शुक्रवार, शनिवार आणि रविवारी ते लावण्‍यात येतील आणि पुन्‍हा रस्‍ता पुर्ववत करण्‍यात येईल. हा संपुर्ण परिसर हेरिटेज असल्‍यामुळे तो पर्यटकांना पाहता यावा तसेच बीपीटीच्‍या जागेचा वापर करून लोकांना मनोरंजन करता यावे म्‍हणून केंद्रीय दळवण मंत्री नितीन गडकरी यांच्‍या खात्‍याने ही संकल्‍पना मांडली आहे. आज याबाबतचे सादरीकरण बीपीटीच्‍या अधिकाऱयांनी पालिका आयुक्‍तांकडे केले. आमदार अॅड आशिष शेलार यांच्‍यासह उपमहापौर अलका केरकर, पालिका गटनेते मनोज कोटक आणि पालिका झोनचे वरिष्‍ठ पालिका आधिकारी आणि बिपीटीचे चेअरमन वंगणे आणि अन्‍य अधिकारी उपस्थित होते. दरम्‍यान, या संकल्‍पनेचे पालिका आयुक्‍तानी स्‍वागत केले असून संबंधित झोनच्‍या अधिकाऱयांना त्‍याबाबत अहवाल तयार करण्‍याचे निर्देश दिले आहेत.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages