झोपडीवासीयांना घराचा ताबा द्या अन्यथा रस्त्यावर उतरू - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

झोपडीवासीयांना घराचा ताबा द्या अन्यथा रस्त्यावर उतरू

Share This
मुंबई - गणेशोत्सवापूर्वी बेघर झोपडीवासीयांना घराचा ताबा द्यावा; अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा रेल्वे झोपडपट्टी पुनर्वसन समितीने दिला आहे. रेल्वे विकास प्रकल्प, मेट्रो-3 मुळे बाधित झालेल्या रहिवाशांची आकडेवारी त्यांच्या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष अध्यक्ष चांगदेव वानखेडे यांनी सरकारकडे सादर केली. मेट्रोच्या तिसऱ्या टप्यात सीप्झ, सारीपूतनगर, दादर, काळबादेवी, एमआयडीसी येथील झोपड्या तोडल्या. त्यामुळे बेघर झालेल्या रहिवाशांना एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी कांजूर मार्ग येथील 15 मजली इमारतीमधील घरांची ताबापत्रे दिली; मात्र ताबा दिला नाही, असा आरोपही समितीने केला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages