हल्ले आणि प्रतिहल्ल्यांनी पालिका सभागृह दणाणले
काॅगेसचा सभात्याग पालिका प्रशासन करणार दोषी कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यां चौकशी
मुंबई,सोमवार ( प्रतिनिधी ) - नालेसफाईच्या निविदेतील अटी आणि शर्थींचा भंग करून कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांनी नालेसफाईत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा केला. त्याला सत्ताधारी भाजप आणि शिवसेना जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केला. तर कंत्राटदारांना वाचविण्यासाठी कॉंग्रेस पक्षाने सभात्याग केल्याचा प्रतिहल्ला सत्ताधाऱ्यांनी केला. त्यामुळे सभागृहात जोरदार हंगामा झाला. कॉंग्रेसने सभात्याग केला, सभागृहात कागदी गोळेफेक आणि घोषणांनी सभागृह दणाणले. अखेर पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याने कॉंग्रेसचा विरोध मावळला. नालेसफाईचा मलिदा गिळणारे बकासूर मोकळे असल्याने पालिका वर्तूळात आश्चर्य व्यक्त होत आहेत.
नालेसफाईतून मलिदा मिळविण्यासाठी शिवसेना भाजपने नालेसफाईच्या प्रस्तावाला मंजूरी दिली. भाजपला आता पालिकेतील सत्तेची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र या घोटाळ्यातून अलिप्त असल्याचे भाजप दाखवित आहे. या घोटाळ्याला सत्ताधारीच जबाबदार असल्याचा खळबळजनक आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिका सभागृहात आज एका निवेदनाद्वारे केला.कंत्राटदारांविरूध्द तसेच अधिकाऱ्यांविरूध्द गुन्हे दाखल करा, त्यांना पाठींशी घालणाऱ्या सत्ताधारी पक्षाविरूध्द कारवाई करा, नव्याने टेंडर काढा, सत्य समोर येवू द्या अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. थेट आरोप केल्यामुळे विरोधी पक्षाचे सदस्यही संतापले. आयुक्तांनी सभागृहात येवून उत्तर देण्याची मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली. महापौर हाय हाय, आयुक्त हायहाय अशा घोषणांनी सभागृह दणाणले. सत्ताधारी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी या गोंधळात एकमेकांवर कागदी गोळे फेकले.कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केल्यानंतर त्यांनी आयुक्त दालनासमोर जोरदार घोषणा दिल्या. पालिका आयुक्तांना कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने निवेदन दिले. आयुक्तांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कॉंग्रेसचे सदस्य शांत झाले. श्रेय घ्या पण सेनेबरोबर घोटाळ्याची जबाबदारीही घ्या अशी भुमिका मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी मांडली. फक्त नऊ कंत्राटदारांविरूध्द कारवाई का असा सवाल त्यांनी केला.
आयुक्तांनी स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी करताच करताच सभागृहात गोंधळाला सुरूवात झाली. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरूध्द घोषणा देवू लागले. कंत्राटदारांना वाचविण्यासाठी ही विरोधकांची खेळी असून त्यासाठीच विरोधकांची युती झाल्याचा आरोप भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केला. गोंधळातच त्यांचे भाषण सुरू होते.कंत्राटदारांविरूध्द गुन्हे दाखल करा, त्यांना काळ्या यादीत टाका,अधिकाऱ्यांविरूध्द कारवाई करा अशी मागणी त्यांनी केली. स्थायी समितीचे अध्यक्ष यशोधर फणसे यांनीही हीच मागणी केली. कोटक यांचे भाषण सुरू असताच कॉंग्रेसच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यांनंतर त्यांनी आयुक्तांची भेट घेतली. कॉंग्रेसच्या सभात्यागानंतर या विषयावरील चर्चा सुरूच होती. सर्वच सदस्यांनी कंत्रादार आणि अधिकाऱ्यांवर ठपका ठेवला.विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन दोषी कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली या मागणीला आयुक्तांनी हिरवा कंदील दाखवत कारवाई करण्याचे मान्य केले