शहरासाठी 40 रुपये आणि उपनगरासाठी 50 रुपये
मुंबई ( प्रतिनिधी ) - बेस्टच्या बसमधून 70 रुपयांत मुंबईभर फिरा, ही पास योजना सुरू आहे. परंतू सर्वच प्रवाशी सर्व मुंबई फिरत नसल्याने आणि प्रवाशी संख्या घटल्याने बेस्टने शहर आणि उपनगर विभागासाठी वेग वेगळी बस पास योजना आणली. शहरासाठी 40 रुपये आणि उपनगरासाठी 50 रुपये पास योजनेला पालिकेच्या सभागृहाची सोमवारी मंजूरी मिळाली. शहरासाठी आणि उपनगरासाठी ही नवी पास योजना मंजूर झाल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला. तातडीचे कामकाज म्हणून बेस्टच्या नव्या पास योजनेला मंजूरी मिळाली. पूर्वीची 70 रुपयांची पास योजना सुरूच राहणार असल्याचे बेस्टच्या सुत्रांनी सांगितले.
